कॅटलोनिया या स्पेनमधील सर्वात श्रीमंत प्रांताचा देशातून स्वतंत्र होण्याचा लढा स्पेन सक्तीने चिरडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 04:30 AM2017-10-22T04:30:56+5:302017-10-22T04:31:10+5:30
कॅटलोनिया या स्पेनमधील सर्वात श्रीमंत प्रांताचा देशातून स्वतंत्र होण्यासाठी सुरू असलेला लढा सक्तीने चिरडून टाकण्याचा निर्धार पंतप्रधान मरिआनो रजॉय यांच्या नेतृत्वाखालील स्पेनच्या संघीय सरकारने शनिवारी जाहीर केला.
माद्रिद : कॅटलोनिया या स्पेनमधील सर्वात श्रीमंत प्रांताचा देशातून स्वतंत्र होण्यासाठी सुरू असलेला लढा सक्तीने चिरडून टाकण्याचा निर्धार पंतप्रधान मरिआनो रजॉय यांच्या नेतृत्वाखालील स्पेनच्या संघीय सरकारने शनिवारी जाहीर केला.
मंत्रिमंडळाच्या तातडीच्या बैठकीनंतर पंतप्रधान रेजॉय यांनी सांगितले की, कॅटलोनियाची स्वातंत्र्याची मागणी पूर्णपणे घटनाबाह्य असल्याने तिचा बीमोड करण्यासाठी राज्यघटनेतील विशेष तरतुदींचा वापर करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यानुसार कॅटलोनियाच्या प्रांतिक कायदेमंडळाच्या अधिकारांवर मर्यादा आणल्या जातील, तेथील सरकार बरखास्त करून केंद्रीय राजवट लागू केली जाईल व येत्या सहा महिन्यांत तेथे प्रांतिक कायदेमंडळासाठी नव्याने निवडणुका घेतल्या जातील. अर्थात येत्या २७ आॅक्टोबर रोजी भरणाºया अधिवेशनात स्पेनच्या संसदेने यास मंजुरी दिली तरच पंतप्रधान हे खास अधिकार वापरू शकतील.
केंद्र सरकारचा विरोध डावलून दोन आठवड्यांपूर्वी कॅटलोनियात स्वातंत्र्यासाठी सार्वमत घेण्यात आले होते व त्यात बहुसंख्य लोकांनी कौल दिल्याचा दावा करून प्रांतिक कायदेमंडळाने स्वतंत्र होण्याचा ठरावही मंजूर केला होता. स्पेनच्या इतिहासातील हा सर्वात मोठा घटनात्मक पेच मानला जात आहे. (वृत्तसंस्था)