कॅटालोनियात सहा महिन्यांत निवडणूक होणार, कॅटालोनियाचे अध्यक्ष व त्यांचे संपूर्ण सरकार बरखास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 04:47 AM2017-10-23T04:47:09+5:302017-10-23T04:47:17+5:30
स्पेनच्या घटनेने दिलेल्या विशेष अधिकारांचा वापर करून पंतप्रधान मारियानो राजोय यांनी कॅटालोनियाचे अध्यक्ष व त्यांचे संपूर्ण सरकार बरखास्त करण्याचे ठरविले आहे.
Next
माद्रिद : स्पेनच्या घटनेने दिलेल्या विशेष अधिकारांचा वापर करून पंतप्रधान मारियानो राजोय यांनी कॅटालोनियाचे अध्यक्ष व त्यांचे संपूर्ण सरकार बरखास्त करण्याचे ठरविले आहे. येत्या सहा महिन्यांत तेथे निवडणूक घेतली जाईल. कॅटालोनियाचे स्वतंत्र होण्याचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठीच्या उपायांची चर्चा करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या शनिवारी तातडीने झालेल्या बैठकीनंतर बोलताना राजोय म्हणाले की, येत्या सहा महिन्यांत त्या भागात देशाच्या संस्थांचे कामकाज सुरळीत चालणे व कायदेशीरपणा पुन्हा मिळविण्यासाठी मी निवडणूक घेर्ईन.