मांजरांमुळे आॅस्ट्रेलिया बेजार, १0 लाख पक्ष्यांचा उडवतात फडशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 05:15 AM2017-10-24T05:15:17+5:302017-10-24T05:15:33+5:30
आॅस्ट्रेलिया या देशाला गेल्या काही वर्षांपासून मांजरांनी त्रस्त केलं आहे. या मांजरांचं करायचं तरी काय, असा प्रश्न देशाच्या सरकारला आणि प्रशासनाला पडला आहे. तिथे पाळीव मांजरांची संख्या प्रचंड आहे.
आॅस्ट्रेलिया या देशाला गेल्या काही वर्षांपासून मांजरांनी त्रस्त केलं आहे. या मांजरांचं करायचं तरी काय, असा प्रश्न देशाच्या सरकारला आणि प्रशासनाला पडला आहे. तिथे पाळीव मांजरांची संख्या प्रचंड आहे. विस्तीर्ण जंगल असल्याने रानमांजरंही खूपच मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या काही जाती तर किलर कॅट्स वा हिंस्र मांजरं म्हणून ओळखल्या जातात. ही जी जंगली वा रानमांजरं तसंच पाळीव मांजरं आहेत, ती रोज साधारणपणे १0 लाख पक्ष्यांचा फडशा उडवतात. रानमांजरांविषयी बोलायचं, तर ती दरवर्षी ३१ कोटींहून अधिक पक्ष्यांना मारून खातात आणि पाळीव मांजरं ६ कोटींहून अधिक पक्षी खातात, असं बायोलॉजिकल कन्वर्सेशन पत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या लेखात म्हटलं आहे. चार्ल्स डार्विन युनिव्हर्सिटीमधील संशोधक जॉन वॉयनारस्की यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. या मांजरांमुळे पक्ष्यांच्या अनेक प्रजाती नष्ट झाल्या आहेत वा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे या मांजरांचं करायचं काय, हा प्रश्न पडला आहे.