Israel Hamas War : इस्रायल-हमास युद्ध ३ दिवसांसाठी थांबवलं; WHO ने सांगितलं 'हे' मोठं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 11:11 AM2024-08-30T11:11:12+5:302024-08-30T11:30:25+5:30

Israel Hamas War : जागतिक आरोग्य संघटनेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायल-हमास युद्ध हे तीन दिवसांसाठी थांबवण्यात आलं आहे.

ceasefire between israel and hamas for 3 days palestinian children will be given polio vaccination | Israel Hamas War : इस्रायल-हमास युद्ध ३ दिवसांसाठी थांबवलं; WHO ने सांगितलं 'हे' मोठं कारण

Israel Hamas War : इस्रायल-हमास युद्ध ३ दिवसांसाठी थांबवलं; WHO ने सांगितलं 'हे' मोठं कारण

जागतिक आरोग्य संघटनेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायल-हमास युद्ध हे तीन दिवसांसाठी थांबवण्यात आलं आहे. रॉयटर्सच्या वृत्तात ही बाब समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, इस्रायली लष्कर आणि पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमासने ६,४०,००० मुलांच्या पोलिओ लसीकरणासाठी तीन दिवसांचा युद्धविराम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

WHO च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितलं की, हा विराम वेगवेगळ्या भागात तीन दिवसांसाठी असेल, जेणेकरून पॅलेस्टिनी मुलांसाठी लसीकरणाचा पहिला टप्पा करता येईल. WHO चे वरिष्ठ अधिकारी रिक पीपरकॉर्न यांनी सांगितलं की, लसीकरण मोहीम रविवारी सकाळी ६ ते दुपारी ३ या वेळेत सुरू होईल. 

अभियान प्रथम मध्य गाझामध्ये सुरू होईल, ज्यासाठी सलग तीन दिवस युद्धविराम राहील. यानंतर लसीकरण मोहीम दक्षिण गाझाकडे जाईल, जिथे युद्ध पुन्हा तीन दिवस थांबवले जाईल. शेवटी, लसीकरण मोहीम उत्तर गाझा मध्ये आयोजित केली जाईल. पीपरकॉर्न म्हणाले की, गरज भासल्यास चौथ्या दिवशीही प्रत्येक भागात युद्ध थांबवलं जाऊ शकते, कारण यावरही एकमत झालं आहे.

आमच्या अनुभवानुसार, पुरेसं कव्हरेज मिळविण्यासाठी अनेकदा एक किंवा दोन दिवस जास्त लागतात असं जागतिक आरोग्य संघटनेचे आपत्कालीन संचालक माईक रायन यांनी गुरुवारी गाझामधील मानवतावादी परिस्थितीवरील बैठकीत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला सांगितले.

पीपरकॉर्न म्हणाले की, हा लसीकरणाचा पहिला टप्पा आहे, चार आठवड्यांनंतर लसीकरणाचा दुसरा टप्पाही आवश्यक असेल. तसेच पोलिओचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व टप्प्यांमध्ये किमान ९० टक्के कव्हरेज आवश्यक आहे.असं रायन यांनी म्हटलं आहे. 

इस्रायली लष्कराच्या युनिटने म्हटलं आहे की, लसीकरण मोहीम इस्रायली लष्कराच्या समन्वयाने राबवली जाईल. इस्रायलने सांगितलं की, लसीकरणादरम्यान कोणतेही युद्ध होणार नाही, या काळात लोक लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचू शकतील. जेणेकरून मुलांचं सहज लसीकरण करता येईल.
 

Web Title: ceasefire between israel and hamas for 3 days palestinian children will be given polio vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.