संयुक्त राष्ट्रांत प्रथमच दिवाळी साजरी
By admin | Published: October 31, 2016 07:08 AM2016-10-31T07:08:43+5:302016-10-31T07:08:43+5:30
दीपोत्सव पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्रांमध्ये अतिशय उत्साहात साजरा होत आहे.
न्यूयॉर्क- दीपोत्सव पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्रांमध्ये अतिशय उत्साहात साजरा होत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयाच्या येथील इमारतीच्या दर्शनी भागावर झगमगती विद्युत रोषणाई करण्यात येऊन, ‘हॅपी दिवाली’ अशी अक्षरे बघणाऱ्यांचे स्वागत करीत होती. दिवाळीचे पारंपरिक प्रतीक दिव्याची प्रतिमा त्याच्यावर चमकत होती. संयुक्त राष्ट्रांत प्रथमच दिवाळी साजरी होत असल्याचे संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी राजदूत सईद अकबरुद्दीन यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे. दिवाळी साजरी करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेचे अध्यक्ष पीटर थॉमसन यांनी पुढाकार घेतल्याबद्दल अकबरुद्दीन यांनी त्यांचे आभार मानले. २९ ते ३१ आॅक्टोबरपर्यंत इमारतीवर ही रोषणाई असेल. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने २०१४ मध्ये दिवाळी साजरी करण्याचा ठराव संमत केला होता.