तुरुंगात ठेवण्याच्या निर्णयाला झकीउर लखवीने दिले आव्हान

By admin | Published: December 26, 2014 07:06 PM2014-12-26T19:06:28+5:302014-12-26T19:16:36+5:30

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड झकीउर रहमान लखवीला जामीन मिळूनही सार्वजनिक सुरक्षा कायद्याखाली तुरुंगातच ठेवण्याच्या पाक सरकारच्या निर्णयाला लखवीने शुक्रवारी इस्लामाबाद हायकोर्टात आव्हान दिले आहे.

Challenge given by Zakiehur Lakhvi to the decision to keep in jail | तुरुंगात ठेवण्याच्या निर्णयाला झकीउर लखवीने दिले आव्हान

तुरुंगात ठेवण्याच्या निर्णयाला झकीउर लखवीने दिले आव्हान

Next

ऑनलाइन लोकमत

इस्लामाबाद, दि. २६ -  मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड झकीउर रहमान लखवीला जामीन मिळूनही सार्वजनिक सुरक्षा कायद्याखाली तुरुंगातच ठेवण्याच्या पाक सरकारच्या निर्णयाला लखवीने शुक्रवारी इस्लामाबाद हायकोर्टात आव्हान दिले आहे. लखवीच्या याचिकेवर  सोमवारी सुनावणी होणार आहे. 
२६/११ च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड झकीउर रहमान लखवीला गेल्या आठवड्यात दहशतवादविरोधी न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. या निर्णयाविरोधात भारताने तीव्र विरोध दर्शवला होता. चोहोबाजूंनी टीका सुरु झाल्यावर पाक सरकारने झकीउर लखवीला तुरुंगातच ठेवण्याचा निर्णय घेतला. लखवीच्या वकिलांनी कारागृह प्रशासनास जामिनाचे आदेश दाखविण्यापूर्वीच प्रशासनाने त्याच्या स्थानबद्धतेचे आदेश तुरुंग अधीक्षकांना सोपविले. त्यामुळे त्याची सुटका टळली होती. 
पाक सरकारच्या या निर्णयाला लखवीने शुक्रवारी इस्लामाबाद हायकोर्टात आव्हान दिले. लखवीला स्थानबद्ध करण्याच्या निर्णयात कायदेशीर प्रक्रियांचे पालन झाले नाही, तसेच सरकारने जे कारण दिले आहे तेदेखील पुरेसे नाही असा दावा लखवीच्या वकिलांनी केला आहे. या याचिकेवरील पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे. लखवीने तुरुंगातून सुटका करावी अशी मागणी पाक सरकारकडे केली होती. शुक्रवारी सरकारने त्याचा अर्ज फेटाळून लावला आहे. 
जामीनाला आव्हान देण्यात पाक सरकारची दिरंगाई 
गेल्या आठवड्यात लखवीच्या जामीनाला आव्हान देऊ अशी घोषणा करणा-या पाकने अद्याप जामीनाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केलेली नाही. बुधवारपासून पाकमधील न्यायालयांना हिवाळी सुट्टी लागली असून यापूर्वी पाक सरकारने जामीनाला आव्हान देणे गरजेचे होते. आता या निर्णयाविरोधात थेट ८ जानेवारीनंतरच याचिका दाखल करता येईल. 

Web Title: Challenge given by Zakiehur Lakhvi to the decision to keep in jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.