ट्रम्प विरुद्ध हिलरी लढतीची शक्यता

By admin | Published: May 4, 2016 02:14 AM2016-05-04T02:14:54+5:302016-05-04T02:14:54+5:30

अमेरिकेत इंडियानात प्रायमरीसाठी मतदान सुरू झाले असताना आता एकूणच निवडणुकीचे अंदाज समोर येऊ लागले आहेत. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी

Chance of Hillary against Trump | ट्रम्प विरुद्ध हिलरी लढतीची शक्यता

ट्रम्प विरुद्ध हिलरी लढतीची शक्यता

Next

वॉशिंग्टन : अमेरिकेत इंडियानात प्रायमरीसाठी मतदान सुरू झाले असताना आता एकूणच निवडणुकीचे अंदाज समोर येऊ लागले आहेत. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकनचे डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिककडून हिलरी क्लिंटन यांच्यात लढत अपेक्षित आहे.
इंडियानात ट्रम्प यांचा विजय झाला, तर टेड क्रूज यांच्या मोहिमेला पूर्णविराम लागू शकतो. आपल्या समर्थकांना उद्देशून बोलताना ट्रम्प म्हणाले की, इंडियानात मोेठी लढत होत आहे. कारण, आम्ही येथे जिंकलो तर विरोधक आपोआपच मार्गातून दूर होणार आहेत. दरम्यान, इंडियानातील प्रायमरी निवडणुकांपूर्वी येथील काही संस्थांनी आणि राजकीय तज्ज्ञांनी केलेल्या अंदाजानुसार ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन यांच्यातच ही लढत होईल. मायक्रोसॉफ्टच्या एका सहयोगी संस्थेने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार ७ जून रोजीच्या रिपब्लिकन प्रायमरीच्या अखेरीस ट्रम्प यांच्याकडे १३६६ प्रतिनिधींचे समर्थन असेल, तर हिलरी यांच्याकडे २६७६ प्रतिनिधी असतील.

Web Title: Chance of Hillary against Trump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.