चंदा कोचर, शिखा शर्मा आणि इंद्रा नुयी शक्तिशाली महिला; फॉर्च्युन नियतकालिकाने जारी केली यादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 01:06 AM2017-09-27T01:06:34+5:302017-09-27T01:07:09+5:30

चंदा कोचर आणि शिखा शर्मा या दोन भारतीय महिलांनी अमेरिकेबाहेरील व्यावसायिक क्षेत्रातील जगातील सर्वांत शक्तिशाली महिलांच्या यादीत नव्याने स्थान मिळविले आहे.

Chanda Kochhar, Shikha Sharma and Indra Nooyi powerful women; List of Fortune Magazine Issues | चंदा कोचर, शिखा शर्मा आणि इंद्रा नुयी शक्तिशाली महिला; फॉर्च्युन नियतकालिकाने जारी केली यादी

चंदा कोचर, शिखा शर्मा आणि इंद्रा नुयी शक्तिशाली महिला; फॉर्च्युन नियतकालिकाने जारी केली यादी

Next

न्यूयॉर्क : चंदा कोचर आणि शिखा शर्मा या दोन भारतीय महिलांनी अमेरिकेबाहेरील व्यावसायिक क्षेत्रातील जगातील सर्वांत शक्तिशाली महिलांच्या यादीत नव्याने स्थान मिळविले आहे. फॉर्च्युन नियतकालिकाने जारी केलेल्या या यादीत इंद्रा नुयी यांनी अमेरिका आवृत्तीत पहिल्या तीन महिलांत स्थान पटकावले आहे.
अमेरिकेबाहेरील जगातील सर्वांत शक्तिशाली व्यावसायिक महिला होण्याचा मान बँको सँटांडेर समूहाच्या कार्यकारी चेअरमन अ‍ॅना बोटीन यांनी पटकावला आहे. या यादीत आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक व सीईओ चंदा कोचर पाचव्या स्थानी असून, अ‍ॅक्सिस बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक व सीईओ शिखा शर्मा २१व्या स्थानी आहेत.
पेप्सीकोच्या चेअरमन आणि सीईओ इंद्रा नुयी यांनी अमेरिकेतील सर्वांत शक्तिशाली महिला व्यावसायिकांच्या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे. पहिल्या स्थानी जनरल मोटर्सच्या चेअरमन मॅरी बारा या आहेत. तिस-या स्थानी लॉकहीड मार्टिनच्या चेअरमन व सीईओ मेरीलीन हेवसन या आहेत. आंतरराष्टÑीय यादीत दुसºया स्थानी जीएसकेच्या सीईओ एम्मा वाल्म्स्ली आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title: Chanda Kochhar, Shikha Sharma and Indra Nooyi powerful women; List of Fortune Magazine Issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.