धर्मद्रोहाचे कायदे बदला, अमेरिकेने पाकिस्तानला फटकारले
By admin | Published: July 30, 2016 03:36 PM2016-07-30T15:36:29+5:302016-07-30T15:36:29+5:30
पाकिस्तानमधील धर्मद्रोहाचे कठोर कायदे बदलण्यात यावेत यासाठी अमेरिकेने पुढाकार घेतला असून पाकिस्तानला चांगलंच फटकारलं आहे
Next
ऑनलाइन लोकमत -
वॉशिंग्टन, दि. 30 - पाकिस्तानमधील धर्मद्रोहाचे कठोर कायदे बदलण्यात यावेत यासाठी अमेरिकेने पुढाकार घेतला असून पाकिस्तानला चांगलंच फटकारलं आहे. पाकिस्तानमध्ये काही दिवसांपुर्वी इस्लाम धर्माचा पवित्र धर्मग्रंथ 'कुराण'चा अपमान केल्याने हिंदू तरुणाची हत्या करण्यात आली होती. तर अल्पसंसख्यांक समुदायातील एका व्यक्तीला अटक करण्यात आली होती.
अमेरिकेच्या खासदारांनी पाकिस्तानमधील धर्मद्रोहाच्या कायद्यावर चिंता व्यक्त केली असून लवकराच लवकर ते बदलण्यात यावेत अशी मागणी केली आहे. 'सिंध येथे 2 सिंधी हिंदू तरुणांना गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली. तर एकाला धर्मद्रोहाच्या कायद्याखाली अटक करण्यात आली. पाकिस्तानमधील धर्मद्रोहाचा कायदा बदलण्याची गरज आहे', असं काँग्रेसमन ब्रॅड शर्मन यांनी ट्विट केलं आहे.
सिंध प्रांतात अल्पसंख्यांक समुदायातील एका व्यक्तीने पवित्र धर्मग्रंथाचा अपमान केल्यानंतर जातीय तणाव वाढला होता. त्या व्यक्तीला नंतर अटक करण्यात आली, पण वाढलेल्या तणावामुळे तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
2 Sindhi Hindu teenagers shot in #Sindh. Another arrested for Blasphemy. Pakistan's Blasphemy law needs to be changed. Now.
— Brad Sherman (@BradSherman) July 29, 2016