दहशतवाद दुस-याची समस्या हा विचार बदला - पंतप्रधान नरेंद्र मोदी
By admin | Published: April 1, 2016 09:16 AM2016-04-01T09:16:23+5:302016-04-01T15:41:32+5:30
अण्विक सुरक्षा परिषदेसाठी अमेरिकेत गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व देशांना दहशतवादा विरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले.
Next
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. १ - अण्विक सुरक्षा परिषदेसाठी अमेरिकेत गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व देशांना दहशतवादा विरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले. दहशतवाद ही दुस-या कोणाची समस्या आहे हा विचार सोडून द्या.
तो त्याचा दहशतवादी, हा माझा दहशतवादी नाही ही वृत्ती बदला असे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी रात्री अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आयोजित केलेल्या डिनर कार्यक्रमात बोलताना म्हणाले.
दहशतवादाचे आज जगभर जाळे आहे. पण आपण या आव्हानाचा सामना करताना आपली कृती देशपातळीवर मर्यादीत रहात आहे. दहशतवादाचा सामना करण्यासाठी मोदींनी सर्व देशांना परस्परातील सहाकार्य वाढवण्याचे आवाहन केले. दहशतवादी आज २१ व्या शतकातील तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. दहशतवाद्यांना आज जगभरातून मदत मिळतेय पण त्यातुलनेत देशांमध्ये सहकार्य वाढलेले नाही असे मोदींनी सांगितले.