चेन्नईतील संकट हवामान बदलामुळे
By admin | Published: December 3, 2015 03:16 AM2015-12-03T03:16:28+5:302015-12-03T03:16:28+5:30
जलवायू परिवर्तनावरील जागतिक परिषदेला उपस्थित असलेल्या भारतीय पर्यावरण तज्ज्ञांनी चेन्नईमध्ये कोसळलेला अभूतपूर्व पाऊस हा जगाच्या वाढलेल्या
ली बर्गेट (पॅरिस) : जलवायू परिवर्तनावरील जागतिक परिषदेला उपस्थित असलेल्या भारतीय पर्यावरण तज्ज्ञांनी चेन्नईमध्ये कोसळलेला अभूतपूर्व पाऊस हा जगाच्या वाढलेल्या तापमानाचा (क्लायमेट चेंज) परिणाम असल्याचे म्हटले आहे.
हवामान बदलाचा पूर्ण फटका आम्ही आता अनुभवत आहोत. चेन्नईमध्ये पडलेला पाऊस हा पृथ्वी अतिशय उष्ण झाल्याचा परिणाम असल्याचे चंद्रभूषण यांनी म्हटले. चंद्रभूषण हे दिल्लीतील सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंटचे उपमहासंचालक आहेत.
जगाचे सरासरी तापमान १ अंशापेक्षा कमीने वाढले आहे. ते दोन अंशाने वाढल्यावर काय होईल याचा विचार करा, असे ते म्हणाले. झालेला पाऊस हा हवामान बदलाचाच परिणाम आहे हे आम्ही १०० टक्के खात्रीने सांगू शकत नाही, असे अॅक्शन एड इंडियाचे हरजित सिंग म्हणाले. (वृत्तसंस्था)