पाकिस्तानातील सिंध प्रांतातील हिंदू लग्न कायद्यात बदल
By Admin | Published: February 18, 2016 01:32 PM2016-02-18T13:32:31+5:302016-02-18T14:00:12+5:30
पाकिस्तानील सिंध प्रांतात राहणारे हिंदू आता लग्न नोंदणीकृत करु शकतात. सिंध प्रांतात असं विधेयकच पास झाल्याने गेली अनेक वर्ष सिंध प्रांतात राहणा-या हिंदूंना मोठा दिलासा मिळाला आहे
ऑनलाइन लोकमत
कराची, दि. 18 - पाकिस्तानील सिंध प्रांतात राहणारे हिंदू आता लग्न नोंदणीकृत करु शकतात. सिंध प्रांतात असं विधेयकच पास झाल्याने गेली अनेक वर्ष सिंध प्रांतात राहणा-या हिंदूंना मोठा दिलासा मिळाला आहे.
पाकिस्तानच्या स्वातंत्र्यापासून पाकिस्तानात राहणा-या हिंदूंना त्यांच्या लग्नाची नोंदणी करण्याचा कोणताही अधिकार दिला नसल्यानं त्यांचे लग्न अधिकृत मानले जात नव्हते. नोंदणी होत नसल्याने लग्न झाल्याचा कोणताच पुरावा त्यांच्याकडे नसायचा त्यामुळे कायदेशीर प्रक्रियेत त्यांना अडथळा येत होता.
सिंध प्रांतात 30 लाख हिंदू राहतात. या निर्णयामुळे बँक खाते खोलण्यासाठी, व्हीजा अर्ज करण्यासाठी तसंच संपत्तीत भागीदारी मिळण्यासाठी फायदा होणार आहे.
या विधेयकामध्ये घटस्फोट घेण्यासाठीची तरतूददेखील करण्यात आली आहे. सिंध प्रांतातील हिंदूंनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे.