शेख हसीना यांच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा; गुन्ह्यांची संख्या आता १५५ झाली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 05:37 AM2024-09-16T05:37:53+5:302024-09-16T05:40:26+5:30
या गुन्ह्यामुळे शेख हसीना यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यांची संख्या आता १५५ झाली असून यात १३६ हत्येच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.
ढाका : बांगलादेशात गेल्या महिन्यांत झालेल्या हिंसक चकमकीत एका विद्यार्थ्याच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी बडतर्फ पंतप्रधान शेख हसीनांसह इतर ५८ जणांवर नवा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या देशात सरकारी नोकऱ्यांत असलेल्या आरक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या मागणीवरून पेटलेल्या आंदोलनानंतर शेख हसीना यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन भारतात आश्रय घ्यावा लागला होता. ४ ऑगस्टला दिनाजपूर येथे सरकारविरुद्ध निदर्शने सुरू असताना पोलिसांनी गोळीबार केल्याचा दावा करून यात आपण जखमी झाल्याची तक्रार फहीम फैजल या विद्यार्थ्याने केली होती. या गुन्ह्यामुळे शेख हसीना यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यांची संख्या आता १५५ झाली असून यात १३६ हत्येच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.