दोन मुलींच्या जननेंद्रियाचे विच्छेदन केल्याचा तिघांवर आरोप
By Admin | Published: April 28, 2017 01:42 AM2017-04-28T01:42:53+5:302017-04-28T01:42:53+5:30
दोन अल्पवयीन मुलींच्या जननेंद्रियाचा शस्त्रक्रियेने (फिमेल जेनिटल म्युटिलेशन) विच्छेद केल्याबद्दल जन्माने भारतीय
वॉशिंग्टन : दोन अल्पवयीन मुलींच्या जननेंद्रियाचा शस्त्रक्रियेने (फिमेल जेनिटल म्युटिलेशन) विच्छेद केल्याबद्दल जन्माने भारतीय असलेला डॉक्टर आणि त्याच्या जन्माने भारतीय असलेल्या पत्नीला आणि आणखी एका जन्माने भारतीय महिला डॉक्टरला अमेरिकेच्या न्यायालयाने आरोपी केले आहे. अमेरिकेमध्ये अशा प्रकारचा हा पहिलाच खटला आहे.
फकरुद्दीन अत्तार (५३), त्याची पत्नी फरिदा अत्तार (५०, दोघेही मिशिगन राज्याचे) यांच्यावर अत्तारच्या लिव्होनियातील मेडिकल क्लिनिकमध्ये दोन अल्पवयीन मुलींच्या जननेंद्रियाचा शस्त्रक्रियेने विच्छेद केल्याचा आरोप बुधवारी ठेवण्यात आला. अत्तारला २१ एप्रिल रोजी अटक झाली.
गेल्या फेब्रुवारी महिन्यात फकरुद्दीनच्या क्लिनिकमध्ये सात वर्षांच्या दोन मुलींच्या जननेंद्रियाचा शस्त्रक्रियेद्वारे विच्छेद करण्यास जन्माने भारतीय असलेल्या जुमना नगरवाला (४४, मिशिगन राज्य) या महिला डॉक्टरने मदत केल्याचा आरोप ठेवला आहे.