स्वस्त प्रवासासाठी इलेक्ट्रिक विमान

By admin | Published: April 7, 2017 12:19 AM2017-04-07T00:19:49+5:302017-04-07T00:19:49+5:30

विमानप्रवास महाग असल्याने अनेकजण रस्ते वा रेल्वेचा पर्याय निवडतात.

Cheap airplane for cheap travel | स्वस्त प्रवासासाठी इलेक्ट्रिक विमान

स्वस्त प्रवासासाठी इलेक्ट्रिक विमान

Next

वॉशिंग्टन : विमानप्रवास महाग असल्याने अनेकजण रस्ते वा रेल्वेचा पर्याय निवडतात. पण लवकरच अमेरिकेतही विमानप्रवास स्वस्त होण्याची शक्यता आहे. आयआयटी दिल्लीमधून मेकॅनिकल इंजिनिअरची पदवी घेणारे आशीषकुमार सध्या स्वस्त विमानप्रवासाचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याच्या प्रकल्पावर काम करीत आहेत.
आशीष कुमार यांच्या
ज्युनम एरो कंपनीने २0२0 पासून हायब्रीड विमानांचे व्यावसायिक उत्पादन सुरु करण्याचे ठरविले आहे. ही हायब्रीड विमाने विजेवर चालणारी असतील. या छोट्या आकाराच्या हायब्रीड विमानांमुळे वेळ आणि विमानप्रवासाचा खर्च कमी होईल आणि छोटी शहरेही हवाई सेवेने जोडता येतील. अमेरिकेप्रमाणे भारतातही ही विमाने उपयुक्त ठरू शकतील. त्यामुळे भारतालाही ही विमाने विकण्याचा ज्युनमची योजना आहे.बोइंग आणि जेट ब्ल्यू या कंपन्यांनीही या प्रकल्पासाठी ज्युनमला पाठबळ दिले आहे. आमची विमाने स्वस्तात उपलब्ध होतील. व्यावसायिक विमानांप्रमाणे ती फार उंचीवरुन उडणार नाहीत तसेच त्यांचा वेग काहीसा कमी असेल. पण ही विमाने कुठल्याही धावपट्टीवर उतरू शकतील, असे आशीषकुमार यांनी सांगितले. पहिले हायब्रीड विमान २0 आसनांचे असेल. एक हजार मैलापर्यंत उड्डाण करू शकणारे इलेक्ट्रिक विमान बनवण्याचे ज्युनमचे लक्ष्य आहे. अन्य विमानांच्या तुलनेत हायब्रीड विमानांमधून ८0 टक्के कमी उत्सर्जन होईल. ही विमाने चालवण्याचा खर्चही कमी असल्याने प्रवास खर्चही कमी होऊ शकेल.

Web Title: Cheap airplane for cheap travel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.