केम छो? विचारत ओबामांनी केले मोदींचे स्वागत
By admin | Published: September 30, 2014 08:48 AM2014-09-30T08:48:55+5:302014-09-30T14:30:21+5:30
केम छो मिस्टर प्राइम मिनिस्टर? असा प्रश्न विचारत अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष बराक ओबामांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत केले.
Next
>ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. ३० - 'केम छो मिस्टर प्राइम मिनिस्टर?' अशा खास गुजराती ढंगात प्रश्न विचारत अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष बराक ओबामांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत केले. पाच दिवसांच्या अमेरिकेच्या दौ-यावर असलेल्या नरेंद्र मोदी यांची बराक ओबामा यांच्याशी महत्वपूर्ण भेट झाली. या डिनर मीटिंगदरम्यान मिशेल ओबामा मात्र अनुपस्थित होत्या.
नरेंद्र मोदी व्हाईट हाऊसमध्ये पोचले असता खुद्द ओबामा यांनी बाहेर येऊन 'केम छो' असा प्रश्न विचारत त्यांनी मोदींचे दिलखुलास स्वागत केले. या भेटीदरम्यान मोदींनी ओबांमाना महात्मा गांधीनी अनुवादित केलेली भगवद्गीता तसेच मार्टिन ल्युथर किंग यांचेही एक पुस्तक भेट दिले.
या डिनर मीटिंगसाठी ओबामा यांच्यासह उपराष्ट्रपती जो बिडेन, परराष्ट्र मंत्री जॉन केरी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सझॅन राइस हे उपस्थित होते. तर मोदी यांच्यासह परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि राजदूत एस. जयशंकर हेही या डिनर मीटिंगसाठी उपस्थित होते. दीड तासांहून अधिक काळ झालेल्या या भेटीदरम्यान मोदी व ओबामा यांच्यात अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. या द्विविपक्षीय भेटीनंतर मोदी व ओबामा दोघेही एका वृत्तपत्रासाठी संयुक्त संपादकीय लिहीणार आहेत, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.
मोदी- आबोमा यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर अनेक भारतीयांनी व्हाईट हाऊसससमोर गरबा खेळत आनंद व्यक्त केला.