'मुलाची सर्व गुन्ह्यांमधून निर्दोष मुक्त केले' ट्रम्प यांनी बायडेन यांच्या निर्णयावर टीका केली; म्हणाले, 'अधिकारांचा गैरवापर केला'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 12:52 PM2024-12-02T12:52:48+5:302024-12-02T12:54:08+5:30
अमेरिकेचे अध्यक्षपद सोडताना जो बायडेन यांनी आपला मुलगा हंटरला माफी दिली आहे आणि संभाव्य तुरुंगवासाच्या शिक्षेपासून वाचवले. यावरुन आता डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडेन यांच्यावर निशाणा साधला .
अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी जाताजाता पोटच्या मुलाचे गंभीर गुन्हे माफ केले आहेत. संभाव्य तुरुंगवासाच्या शिक्षेपासून वाचवले आहे. यावरुन आता आरोप -प्रत्यारोप सुरू आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडेन यांच्यावर निशाणा साधला असून बायडेन यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केला असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. पोस्टमध्ये ट्रम्प म्हणाले, बायडेन यांन आपला मुलगा हंटरला जी माफी दिली आहे त्यात j-6 कैद्याचाही समावेश आहे का? जो वर्षानुवर्षे तुरुंगात आहे. ट्रम्प म्हणाले, हा न्यायाचा किती गैरवापर आहे.
J6 कैदी ६ जानेवारी २०२१ रोजी कॅपिटल हिलवर झालेल्या दंगलीतील गुन्हेगार म्हणून तुरुंगात टाकलेल्या लोकांचा संदर्भ देतात. ट्रम्प आणि त्यांच्या समर्थकांनी पकडलेल्या लोकांना ओलीस म्हटले आहे आणि दावा केला आहे की ते शांततेने आणि देशभक्तीने वागत आहेत.
बायडेननी जाता जाता शब्द मोडला; चेन स्मोकर मुलाला गंभीर गुन्ह्यांतून दोषमुक्त केले
तसेच, असा कयास लावला जात आहे की डोनाल्ड ट्रम्प एकदा अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ते ६ जानेवारी २०२१ रोजी कॅपिटल हिल वेढा प्रकरणी तुरुंगात असलेल्यांना माफी देतील.
जो बायडेन यांचा मुलगा हंटर यांच्यावर आरोप कोणते होते?
बायडेन यांनी रविवारी त्यांचा मुलगा हंटरच्या माफीवर स्वाक्षरी केली, हंटरवर बंदुकीबाबतचा गुन्हा आणि कर उल्लंघनाशी संबंधित आरोपांवर दोषी ठरवण्यात आले होते. या गुन्ह्यांसाठी हंटरला यापुढे शिक्षेला सामोरे जावे लागणार नाही.
फक्त त्यांचा मुलगा असल्याने त्यांना लक्ष्य करण्यात आले, असा युक्तिवाद बायडेन यांच्या वतीने करण्यात आला. बायडेन म्हणाले की त्यांनी आपल्या कारकिर्दीत एक साधे तत्व पाळले आहे. ते नेहमी न्याय्य असतील. 'माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे, असंही ते म्हणाले. मला वाटते की एका वडील आणि राष्ट्राध्यक्षाने हा निर्णय का घेतला हे अमेरिकन लोकांना समजेल, असंही बायडेन म्हणाले.