टोरांटोमध्ये हॉटेलबाहेर अंदाधुंद गोळीबार ; एकाचा मृत्यू, 13 जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 09:37 AM2018-07-23T09:37:04+5:302018-07-23T11:32:23+5:30
टोरांटो येथील एका हॉटेलबाहेर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेमध्ये 13 जण जखमी झाले आहेत.
कॅनडामधील टोरांटो शहरातील ग्रीक टाऊन परिसरात रविवारी (22 जुलै) उशिरा एका व्यक्तीनं अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात एक महिलेचा मृत्यू झाला असून अन्य 13 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
टोरांटो पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार करणारा हल्लेखोरदेखील ठार झाला आहे. ग्रीक टाऊनमधील एका हॉटेलमध्ये अंदाधुंद गोळीबार सुरू असल्याची माहिती देणारा फोन आला. हॉटेलमधूनच रात्री जवळपास 10 वाजण्याच्या सुमारास हा फोन आला होता. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराने जवळपास 25 गोळ्या झाडल्या. या घटनेमुळे परिसरात गोंधळ उडाला. दरम्यान, जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.
#UPDATE 1 killed, 13 injured in shooting at Toronto's Danforth & Logan avenues, shooter dead: Toronto Police pic.twitter.com/f4FrOyMabc
— ANI (@ANI) July 23, 2018
#Canada: 9 people were shot in #Toronto 's Danforth and Logan Avenue, Shooter has died. Conditions of victims including a young girl is unknown: Toronto Police
— ANI (@ANI) July 23, 2018
Toronto police say they are investigating reports of a shooting in the area of Danforth and Logan avenues. 8 people taken to hospital after shooting in Danforth: Canadian media https://t.co/B266AI19IH
— ANI (@ANI) July 23, 2018
Multiple casualties in Toronto shooting, says reports: AFP pic.twitter.com/6tQnu24EW0
— ANI (@ANI) July 23, 2018