बच्चा खान विद्यापीठ महिन्याने सुरु, शिक्षकांना बंदूक बाळगण्याची परवानगी

By Admin | Published: February 15, 2016 06:32 PM2016-02-15T18:32:51+5:302016-02-15T18:42:20+5:30

दहशतवादी हल्ल्यानंतर बंद करण्यात आलेलं पाकिस्तानातील बच्चा खान विद्यापीठ तब्बल 1 महिन्यानंतर पुन्हा सुरु, शिक्षकांना परवानाधारक शस्त्र बाळगण्याची परवानगी

The child started the month of Khan Khan, allowing teachers to carry guns | बच्चा खान विद्यापीठ महिन्याने सुरु, शिक्षकांना बंदूक बाळगण्याची परवानगी

बच्चा खान विद्यापीठ महिन्याने सुरु, शिक्षकांना बंदूक बाळगण्याची परवानगी

googlenewsNext


ऑनलाइन लोकमत
पेशावर, दि.15 - दहशतवादी हल्ल्यानंतर बंद करण्यात आलेलं पाकिस्तानातील बच्चा खान विद्यापीठ तब्बल 1 महिन्यानंतर पुन्हा सुरु झालं आहे. सुरक्षेच्या कारणास्तव विद्यापीठाने शिक्षकांना परवानाधारक शस्त्र बाळगण्याची परवानगी दिली आहे. मात्र विद्यार्थ्यांना ही परवानगी देण्यात आलेली नाही.
हल्ल्यानंतर बच्चा खान विद्यापीठ बंद करण्यात आलं होतं. मात्र आता नव्याने पुन्हा सुरुवात करताना विद्यापीठाने सुरक्षेची विशेष काळजी घेतली आहे.  विद्यापीठाने परिसरात सीसीटीव्ही लावलेत तसंचं शस्त्रधारी सुरक्षारक्षकांची नेमणूक केली आहे, यासोबतच सुरक्षाभिंतींची उंचीदेखील वाढवली आहे. विशेष बाब म्हणजे विद्यापीठाने शिक्षकांना परवानाधारक शस्त्र बाळगण्याची परवागी दिली आहे मात्र विद्यार्थ्यांसमोर त्यांचं प्रदर्शन न करण्याची सूचनाही केली आहे. तसंचं ज्या विद्यार्थ्यांकडे शस्त्र असतील त्यांना गेटवरच ती जमा करावी लागतील.
गेल्या महिन्यात बच्चा खान विद्यापीठावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता, ज्यामध्ये 20 जणांचा मृत्यू झाला होता. या हल्यानंतर पाकिस्तानी तालिबान दहशतवाद्यांनी अशाच प्रकारे शाळा आणि विद्यापीठांना टार्गेट करण्याची धमकी दिली होती.

Web Title: The child started the month of Khan Khan, allowing teachers to carry guns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.