चीन : स्फोट मालिकेत ३१ ठार
By Admin | Published: May 23, 2014 12:29 AM2014-05-23T00:29:19+5:302014-05-23T00:29:19+5:30
चीनच्या झिजियांग प्रांताची राजधानी उरुमकी येथे झालेल्या स्फोट मालिकेत ३१ ठार झाले असून, ९० जखमी झाले आहेत. येथील खुल्या बाजारपेठेत हे स्फोट झाले
बीजिंग : चीनच्या झिजियांग प्रांताची राजधानी उरुमकी येथे झालेल्या स्फोट मालिकेत ३१ ठार झाले असून, ९० जखमी झाले आहेत. येथील खुल्या बाजारपेठेत हे स्फोट झाले. चीनच्या या प्रांतात मुस्लिम बहुसंख्य असून, अलीकडच्या काळातील हा सर्वात भीषण हल्ला मानण्यात येत आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी ७.५० वाजता दोन वाहने खुल्या बाजारातील लोकांच्या अंगावर आली व त्यात चालकाच्या बाजूला बसलेल्या लोकांनी लोकांच्या अंगावर स्फोटके फेकून दिली. त्यातल्या एका वाहनाचा बाजारात स्फोट झाला. त्यामुळे मृतांची संख्या वाढली. या दुर्घटनेत ३१ जण ठार झाले असून, ९० जण जखमी झाले आहेत. हल्लेखोरांनी सुमारे बारा स्फोटके फेकली होती. जखमींना विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. हल्ल्याचे वृत्त येताच अध्यक्ष शी जिनपिंग यांनी दहशतवाद्यांना कडक शिक्षा करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. हा दहशतवादी हल्ला असून, त्यातील हिंसाचार भीषण आहे, असे सार्वजनिक सुरक्षा मंत्रालयाने म्हटले आहे. चीनमधील टिष्ट्वटरसारख्या वायबो या वेबसाईटवर हल्ल्याची छायाचित्रे टाकण्यात आली असून, त्यात मृतदेह रस्त्यावर पडलेले दिसत आहेत. झिजियांग प्रांत पाकव्याप्त काश्मीर अफगाणच्या सीमेवर असून, गेल्या कित्येक वर्षांपासून हिंसाचारव्याप्त आहे. चीनच्या अधिकार्यांच्या मते या हिंसाचाराला तुर्की इस्लाम चळवळ जबाबदार आहे. झिजियांग प्रांतात मुस्लिम उईगुर व हान वंशीयात नेहमीच दंगली होतात. हल्ला भीषण हिंसाचार मानला जात आहे, कारण आतापर्यंत चाकू हल्ले करणार्या दहशतवाद्यांनी स्फोटके व कारबॉम्ब यांचा प्रथमच वापर केला आहे. (वृत्तसंस्था)