चीनच्या विमान कंपनीचा भारतीयांपासून सावध राहण्याचा इशारा
By admin | Published: September 8, 2016 12:58 PM2016-09-08T12:58:41+5:302016-09-08T12:58:41+5:30
चीनची विमान सेवा देणारी कंपनी 'एअर चायना' सध्या वादात सापडली आहे. भारतीयांसंबंधी केलेल्या टिपणीमुळे ही कंपनी चर्चेत आहे
Next
- ऑनलाइन लोकमत
बीजिंग, दि. 8 - चीनची विमान सेवा देणारी कंपनी 'एअर चायना' सध्या वादात सापडली आहे. भारतीयांसंबंधी केलेल्या टिपणीमुळे ही कंपनी चर्चेत आहे. एका चिनी महिला पत्रकाराने केलेल्या ट्वीटनंतर याबाबत खुलासा झाला आहे. लंडनला जाणा-या आपल्या नागरीकांना भारतीय आणि पाकिस्तानी नागरिकांपासून सावध राहण्याचा इशारा या कंपनीने आपल्या ट्रॅव्हल मॅगझीनमधून दिला आहे.
'लंडन हे सुरक्षीत शहर आहे, मात्र येथे ज्या ठिकाणी भारतीय , पाकिस्तानी आणि कृष्णवर्णिय नागरीकांची संख्या जास्त आहे तेथे काळजी घेण्याची गरज आहे. भारतीय , पाकिस्तानी आणि कृष्णवर्णिय नागरीकांची वस्ती असलेल्या ठिकाणी जाण्याआधी योग्य ती खबरदारी घ्यावी आणि सुरक्षेची पूर्ण काळजी घ्यावी. पर्यटकांनी रात्रीच्या वेळी एकटं घराबाहेर पडू नये तसेच महिलांनी सहप्रवाशासोबतच प्रवास करावा,' असं असं या मॅगझीनमध्ये सांगण्यात आलं आहे.
चिनी पत्रकार हेज फेन यांनी लंडनचे मेयर सादिक खान यांना याबाबत फोटो ट्वीट करून माहिती दिली आहे. लंडनचे मेयर सादिक खान यांचे आई-वडिल हे पाकिस्तानी असून ते स्वतः लंडनचे नागरिक आहेत. जुलै महिन्यातच त्यांनी #LondonIsOpen हे कॅम्पेन सुरू केलं होते.
My story on my own experience reading Air China tips on safety in #London@MayorofLondon@markboleathttps://t.co/CeXcROfabc
— Haze Fan (@journohaze) September 7, 2016
चीनमध्ये या पुर्वी देखील एका कपडे धुण्याच्या डिडर्जंटच्या जाहिरातीत रंगभेद दाखवण्यात आला होता. त्यासाठी मे महिन्यात संबंधित कंपनीला माफी देखील मागावी लागली होती.