भारताविरोधात चीन- बांगलादेशचा कट? चीनच्या राजदूताने जमात-ए-इस्लामी पक्षाची भेट घेतली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 03:02 PM2024-09-04T15:02:59+5:302024-09-04T15:04:09+5:30
बांगलादेशात काही दिवसापूर्वी सत्तांतर झाले आहे. जमात-ए-इस्लामी बांगलादेश पक्षाने सत्ता स्थापन केली आहे. आता या पक्षाने चीनसोबत संबंध वाढवले आहेत.
काही दिवसापूर्वी बांगलादेशात नोकरीतील आरक्षणाविरोधात आंदोलन सुरू होते. या आंदोलनामुळे बांगलादेशात सत्तांत्तर झाले. माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी पदाचा राजीनामा देऊन देश सोडला. शेख हसीना यांचे सरकार पडल्यानंतर आता चीन भारताविरुद्ध कट रचत आहे. बांगलादेशमध्ये चीन भारतविरोधी संघटनांना भेटत असल्याच्या बातम्या येत आहेत. चीन बांगलादेशातील नवीन सरकार आणि इस्लामिक पक्षांशी मैत्री वाढवत आहे.
सोमवारी चीनचे राजदूत याओ वेन ढाका येथील जमात-ए-इस्लामी बांगलादेश पक्षाच्या कार्यालयात पोहोचले, तेथे त्यांनी पक्षाचे कौतुकही केले. चीनच्या राजदूताने सांगितले की, जमात-ए-इस्लामी हा एक सुसंघटित पक्ष आहे. बांगलादेशमध्ये जमात-ए-इस्लामी भारताला विरोध करते, शेख हसीना सरकारने त्यावर बंदी घातली होती, परंतु मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारने ही बंदी हटवली.
महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
शेख हसीना यांच्या सरकारच्या काळातही चीन भारताविरुद्ध कट रचत होता. शेख हसीना यांच्या अवामी लीग या पक्षाशीही चीनचे सखोल संबंध होते. आता चीन बांगलादेशातील अंतरिम सरकार आणि जमात-ए-इस्लामी सारख्या संघटनांशी मैत्री करत आहे. ही संपूर्ण घटना भारतासाठी चिंतेची बाब आहे, कारण बांगलादेशातील भारताच्या प्रभावामुळे जमात-ए-इस्लामी पक्षही चिडला आहे.
जर हा पक्ष चीनच्या पाठिंब्याने सत्तेत आला तर बांगलादेशात असे सरकार स्थापन होईल जे दहशतवाद, सीमा सुरक्षा आणि प्रादेशिक स्थैर्य या मुद्द्यांवर भारताच्या विरोधात असेल. नवीन सरकारमध्ये चीन बांगलादेशातील बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह प्रकल्पाला गती देऊ शकतो, जेणेकरून भारताचा प्रभाव कमी करता येईल. अंतरिम सरकारचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार तौहीद हुसैन यांनी जूनमध्ये भारतासोबत केलेले करार राष्ट्रीय हितसंबंधांनुसार नसतील तर त्यांचा पुनर्विचार केला जाईल, असं म्हटल्याची माहिती मिळाली होती. शेख हसीना यांच्या २२ जूनच्या भारत दौऱ्यादरम्यान या सर्व करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.