चिंताजनक! आणखी धोकादायक रुपात परतणार कोरोना?; चीनच्या 'बॅटवुमन'ने दिली वॉर्निंग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 12:24 PM2023-09-26T12:24:16+5:302023-09-26T12:25:58+5:30
चीनच्या वुहान लॅबशी संबंधित झेंगली सांगतात की, जगात कोरोनासारखी दुसरी महामारी येणार आहे. ही साथ रोखण्यासाठी आतापासूनच तयारी सुरू करावी.
चीनच्या एक प्रमुख वायरोलॉजिस्टने पुन्हा एकदा कोरोनाबाबत इशारा दिला आहे. वायरोलॉजिस्ट शी झेंगली यांनी म्हटलं आहे की, भविष्यात कोरोनाची आणखी एक लाट येण्याची दाट शक्यता आहे. झेंगली यांना चीनमध्ये 'बॅटवुमन' म्हणूनही ओळखलं जातं.
चीनच्या वुहान लॅबशी संबंधित झेंगली सांगतात की, जगात कोरोनासारखी दुसरी महामारी येणार आहे. ही साथ रोखण्यासाठी आतापासूनच तयारी सुरू करावी. हा दावा त्यांच्या कौशल्यावर आधारित आहे कारण कोरोनाव्हायरस पूर्वी 2003 सीवियर एक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम (SARS) आणि कोविड-19 साथीच्या रोगांचं कारण झाला आहे.
शी झेंगली यांनी प्राण्यांपासून माणसांमध्ये, विशेषत: वटवाघुळांपासून माणसांमध्ये पसरणाऱ्या व्हायरसच्या क्षेत्रात व्यापक संशोधन केलं आहे, ज्यामुळे त्यांना चीनची बॅटवूमन म्हटलं जातं. शी यांनी इशारा दिला आहे की जगाने कोविड-19 सारख्या महामारीसाठी तयार राहावे.
शी यांनी स्टडी पेपरमध्ये म्हटलं आहे की, भविष्यात आपल्याला कोरोनासारख्या दुसऱ्या महामारीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. झेंगली आणि त्यांच्या टीमने 40 कॅटेगरींवर हे संशोधन केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी 40 वेगवेगळ्या कोरोना प्रजातींचे मूल्यांकन केलं. नंतर असं आढळून आले की यापैकी निम्म्या प्रजाती अत्यंत धोक्यात आहेत.
शी झेंगली यांचा दावा विविध व्हायरल विश्लेषणांवर आधारित आहे, ज्यात लोकसंख्या, अनुवांशिक विविधता आणि झुनोटिक ट्रान्समिशनचा इतिहास (प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरणारे रोग) यांचा समावेश आहे. मात्र, झेंगलीच्या या संशोधनावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काही अमेरिकन नेत्यांना शंका आहे की ती काम करत असलेल्या वुहान इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीमुळे कोरोना पसरला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.