मसूद अजहरविरोधातील युनोमधील प्रस्ताव रद्द; चीनची पुन्हा पाकिस्तानला नापाक मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 11:46 PM2019-03-13T23:46:54+5:302019-03-14T07:16:38+5:30
मसूद अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रयत्नांना पुन्हा सुरुंग
नवी दिल्ली: जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना चीननं पुन्हा एकदा सुरुंग लावला आहे. मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रात प्रस्ताव आणण्यात आला होता. मात्र चीननं नकाराधिकाराचा वापर केला. त्यामुळे भारताला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचे प्रयत्न निष्फळ ठरवण्याची चीनची ही चौथी वेळ आहे.
China blocks India's bid to designate JeM Chief Masood Azhar as a global terrorist in the United Nations Security Council 1267 list. pic.twitter.com/rtQJQqNOWj
— ANI (@ANI) March 13, 2019
MEA: The 1267 Sanctions Committee, upon completion of the no-objection period on 13 March 2019, wasn't able to come to a decision on the proposal for listing Mohammed Masood Azhar under the UN Sanctions regime, on account of a member placing the proposal on hold. https://t.co/1bDSSlyjjJ
— ANI (@ANI) March 13, 2019
Sources: More than 10 countries had supported India's bid to designate JeM Chief Masood Azhar as a global terrorist in the United Nations Security Council 1267 list, as co-sponsors. pic.twitter.com/9Frd5LUEBJ
— ANI (@ANI) March 13, 2019
पुलवामातील आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदनं स्वीकारली होती. या हल्ल्यानंतर अजहरची एक ऑडियो टेप समोर आली होती. यात भाचा उस्मानच्या हत्येचा बदला घेण्याची सूचना त्यानं दहशतवाद्यांना केली होती. मात्र चीननं संयुक्त राष्ट्रात जैश आणि अजहरचा संबंध नसल्याचा दावा केला. मसूदच्या विरोधात कोणतेही पुरावे नाहीत, असाही दावा चीनकडून करण्यात आला. या प्रकरणी भारतानं मसूदच्या ऑडियो टेप संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेला दिल्या. जैश आणि मसूदचे संबंध यामधून स्पष्ट होत होते.
MEA: We are disappointed by this outcome. This has prevented action by the international community to designate the leader of (JeM), a proscribed and active terrorist organization which has claimed responsibility for the terrorist attack in Jammu and Kashmir on 14 February 2019.
— ANI (@ANI) March 13, 2019
Ministry of External Affairs: We are grateful for the efforts of the Member States who moved the designation proposal and the unprecedented number of all other Security Council members as well as non-members who joined as co-sponsors. https://t.co/riSegaure5
— ANI (@ANI) March 13, 2019
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य असलेल्या चीननं नकाराधिकाराचा वापर केला. त्यामुळे मसूदला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचा भारताचा प्रयत्न निष्फळ ठरला. पुलवामातील हल्ल्यानंतर भारतानं जैश आणि मसूदच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण कागदपत्रं अमेरिका आणि फ्रान्सला दिली होती. संयुक्त राष्ट्रातही भारतानं मसूदविरोधात सबळ पुरावे दिले होते. त्यामुळे भारताला अमेरिकेची भक्कम साथ मिळाली होती. मात्र चीननं नकाराधिकाराचा वापर करत भारताच्या प्रयत्नांना चौथ्यांदा सुरुंग लावला.