चार वर्षांत Boeing 737 विमानाचे तीन मोठे अपघात; 346 लोकांनी गमावला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 04:40 PM2022-03-21T16:40:58+5:302022-03-21T16:46:37+5:30
Boeing 737 Plane : चीनचे बोइंग 737 विमान कुनमिंगहून ग्वांगझूसाठी जात असताना Guangxi येथे कोसळले. या विमानात 133 प्रवासी होते.
चीनमध्ये झालेल्या अपघातानंतर बोइंग 737 (Boeing 737) विमान पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. चीनचे बोइंग 737 विमान कुनमिंगहून ग्वांगझूसाठी जात असताना Guangxi येथे कोसळले. या विमानात 133 प्रवासी होते. या अपघातात किती लोकं वाचली, किती जणांचे जीव गेले याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सध्या बचावकार्य जोरात सुरू असल्याचे तेथील स्थानिकांनी सांगितले.
दरम्यान, या धक्कादायक विमान अपघातामुळे 10 मार्च 2019 चा दिवसही आठवला, जेव्हा इथिओपियामध्ये बोईंग 737 विमान कोसळले. विमानात 157 लोक होते आणि सर्वांचा मृत्यू झाला होता. एडिस अबाबाजवळ हा अपघात झाला होता. हे विमान इथियोपियन एअरलाइन्सचे होते. हे विमान केनियाची राजधानी नैरोबीला जात होते. विमानात एकूण 149 प्रवासी आणि 8 क्रू मेंबर्स होते. बोले इंटरनेशनल एयरपोर्टवरून विमानाने उड्डाण केले आणि कंट्रोल रूमशी त्याचा संपर्क तुटला.
चीनचे Boeing 737 विमान १३३ प्रवाशांसह पर्वतावर आदळले, जळून खाक झाले; जंगलात ज्वालामुखी फुटल्यासारखा आवाज !
— Lokmat (@lokmat) March 21, 2022
सविस्तर वाचा : https://t.co/W1BuV5aUgA वर ! #Lokmat#ChinaNews#NationalNewspic.twitter.com/pDHOfSjknK
ऑक्टोबर 2018 मध्येही झाला होता मोठा अपघात
या घटनेपूर्वी ऑक्टोबर 2018 मध्ये इंडोनेशियामध्येही एक अपघात झाला होता. इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे 29 ऑक्टोबर 2018 रोजी एक मोठा विमान अपघात झाला होता. जकार्ताहून टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या 13 मिनिटांत लायन एअरचे विमान कोसळले. या विमानात कर्मचाऱ्यांसह एकूण 189 जण होते. या 189 लोकांमध्ये 178 लोकांव्यतिरिक्त 3 मुले, 2 पायलट आणि 5 केबिन क्रू होते. या अपघातात सर्व 189 जणांचा मृत्यू झाला. आजच्याच दिवशी 9 वर्षांपूर्वी म्हणजेच 2013 मध्येही येथे बोइंग-737 विमान कोसळले होते. या अपघातात सुमारे 108 जणांचा मृत्यू झाला होता.