China Brain Control Weapons: चीन डोक्याचा ताप वाढवणार! शत्रूच्या सैन्याला मारणार नाही, पण...; अमेरिकेचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 01:08 PM2021-12-31T13:08:29+5:302021-12-31T13:09:38+5:30

China Brain Control Weapons: अमेरिकेने चीनच्या अकादमी ऑफ मिलिट्री मेडिकल सायन्सेज (China's Academy of Military Medical Sciences) सह ११ संशोधन केंद्रांवर प्रतिबंध लावले आहेत.

China Brain Control Weapons: China Will not kill enemy troops, but ...; America's sensational claim | China Brain Control Weapons: चीन डोक्याचा ताप वाढवणार! शत्रूच्या सैन्याला मारणार नाही, पण...; अमेरिकेचा खळबळजनक दावा

China Brain Control Weapons: चीन डोक्याचा ताप वाढवणार! शत्रूच्या सैन्याला मारणार नाही, पण...; अमेरिकेचा खळबळजनक दावा

Next

कोरोना महामारीच्या आधीपासून जगाच्या डोक्याला ताप असलेला चीन आता आणखी डोकेदुखी वाढविणार आहे. अमरेरिकेने केलेल्या दाव्यानुसार चीन असे शस्त्र बनवत आहे जे शत्रूला जिवे न मारताच पॅरालाईज (Paralyze) किंवा नियंत्रित करणार आहे. यामुळे चीन वेगळीच लढाई छेडणार असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. 

चीन दुसऱ्याचा मेंदू नियंत्रणात ठेवण्याचे हत्यार बनवत आहे, असे अमेरिकेने म्हटले आहे. याला अमेरिकेने ब्रेन कंट्रोल वेपन असे नाव दिले आहे. तंत्रज्ञानाच्या लढाईत चीन एवढा पुढे गेला आहे की आता लोकांना पॅरालाईज किंवा त्यांच्या मेंदूवर दुरून नियंत्रण ठेवण्याच्या (Brain Control Weapons) फॉर्म्युल्यावर (Technological War)  काम करत असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.

यामुळे अमेरिकेने चीनच्या अकादमी ऑफ मिलिट्री मेडिकल सायन्सेज (China's Academy of Military Medical Sciences) सह ११ संशोधन केंद्रांवर प्रतिबंध लावले आहेत. यावर बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून मेंदू नियंत्रण हत्यारे विकसित करण्याचा आरोप करण्यात आला आहे. चीनच्या या संस्थांना ब्लॅकल्सिट करणाऱ्या अमेरिकेच्या वाणिज्य विभागाने या शस्त्रांबद्दल अधिक माहिती दिलेली नाही. मात्र, २०१९ मध्ये लिहिलेल्या सैन्याच्या कागदपत्रांमध्ये याचे संकेत दिले आहे. बिजिंगला काय मिळवायचे आहे, हे यात म्हटले आहे. 

चीनला शत्रू सैनिकांचे मृतदेह नष्ट करायचे नसून त्यांच्या मनावर हल्ला करायचा आहे, असा दावा अमेरिकन सूत्रांनी केला आहे. त्यांना पक्षाघात करून त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे तंत्र विकसित करत आहे. 'डेली मेल'मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, बायोटेकसह अनेक महत्त्वाच्या क्षेत्रात चीन अमेरिकन तंत्रज्ञान घेण्याचा प्रयत्न करत आहे. एका अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले की, चीन जे तंत्रज्ञान विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे त्यात 'जीन एडिटिंग, मानवी कार्यक्षमता वाढवणे आणि मेंदू मशीन इंटरफेसचा समावेश आहे.

Web Title: China Brain Control Weapons: China Will not kill enemy troops, but ...; America's sensational claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :chinaचीन