चीनने व्हिएतनामशी राजनैतिक संबंध तोडले

By admin | Published: May 19, 2014 03:43 AM2014-05-19T03:43:32+5:302014-05-19T03:43:32+5:30

दक्षिण चिनी समुद्रातील वादामुळे व्हिएतनाममध्ये उसळलेल्या चीनविरोधी दंगलीचा चीनला संताप आला असून, चीनने आज व्हिएतनामशी राजनैतिक संबंध तोडण्याचा निर्णय घेतला.

China broke political relations with Vietnam | चीनने व्हिएतनामशी राजनैतिक संबंध तोडले

चीनने व्हिएतनामशी राजनैतिक संबंध तोडले

Next

बीजिंग : दक्षिण चिनी समुद्रातील वादामुळे व्हिएतनाममध्ये उसळलेल्या चीनविरोधी दंगलीचा चीनला संताप आला असून, चीनने आज व्हिएतनामशी राजनैतिक संबंध तोडण्याचा निर्णय घेतला. चीनने आज व्हिएतनाममधील ३ हजार नागरिक मायदेशी परत बोलावले आहेत. चीनच्या मेटलर्जीकल कॉर्पोरेशन (१९) चे कर्मचारी चीनच्या सिचुआन प्रांतातील चेंगडू विमानतळावर उतरले. व्हिएतनाममधील चिनी दूतावासाच्या मदतीने त्यांना मायदेशी आणले, असे चीनच्या परराष्टÑ मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे. व्हिएतनामबरोबर परस्पर सहकार्याच्या काही योजना आम्ही थांबवत आहोत, असे चीनच्या परराष्टÑ मंत्रालयाचे प्रवक्ते होंग ली यांनी सांगितले. हा निर्णय व्हिएतनाममध्ये उसळलेल्या चीनविरोधी दंगलीमुळे घेतला, असे त्यांनी म्हटले आहे; पण त्यापेक्षा जास्त स्पष्टीकरण देण्यात आले नाही. व्हिएतनाममध्ये उसळलेल्या दंगलीत दोन चिनी नागरिक ठार झाले असून, १०० जखमी झाले आहेत. या दंगलीचे परिणाम यावर बोलताना होंग ली यांनी संबंध तडत असल्याचीही माहिती दिली. व्हिएतनामला जाणार्‍या चिनी नागरिकांवरील सुरक्षेचा इशारा आता मागे घेण्यात आला आहे, कारण चिनी नागरिक यापुढे व्हिएतनामला जाणारच नाहीत, असेही त्यांनी सांगितले. व्हिएतनाममध्ये १३ मेपासून परदेशी कंपन्यावर हल्ले होत आहेत. त्यामुळे चीनची जीवितहानी झाली असून, मालमत्तेचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे परस्पर सहकार्य व संचार यासाठी योग्य असे वातावरण राहिलेले नाही. पुढच्या काळात घडणार्‍या घटना पाहून पुढचे निर्णय घेतले जातील, असे त्यांनी म्हटले आहे. व्हिएतनाम सरकार चीनविरोधी दंगलग्रस्तांना मदत करत असल्याचा चीनचा आरोप आहे. गेल्या काही दिवसांत व्हिएतनामच्या दंगलग्रस्तांनी चिनी कारखान्यांवर केलेल्या हल्ल्यात २१ चिनी नागरिक मारले गेल्याचे अनधिकृत वृत्त आहे; पण चीन सरकार दोनच जण मारले गेल्याचे स्वीकारत आहे. दोन्ही देशांच्या आरमारी नौकांनी ५०० वेळा परस्परांच्या जलक्षेत्रात प्रवेश केला आहे; पण गोळीबाराच्या घटना घडलेल्या नाहीत. व्हिएतनाममध्ये चीनविरोधी आंदोलनाने जोर धरला आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: China broke political relations with Vietnam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.