चीन बांधतोय ‘ग्रेट वॉल आॅफ सॅण्ड’
By admin | Published: April 1, 2015 11:20 PM2015-04-01T23:20:29+5:302015-04-01T23:20:29+5:30
जगातील सर्वांत मोठी भिंत (ग्रेट वॉल आॅफ चायना) असलेला चीन दक्षिण चीन समुद्रामध्ये वाळूची मोठी भिंत (ग्रेट वॉल आॅफ सॅण्ड) उभारत असल्यामुळे
Next
बीजिंग : जगातील सर्वांत मोठी भिंत (ग्रेट वॉल आॅफ चायना) असलेला चीन दक्षिण चीन समुद्रामध्ये वाळूची मोठी भिंत (ग्रेट वॉल आॅफ सॅण्ड) उभारत असल्यामुळे त्याच्या मनसुब्यांबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे, असे एका वरिष्ठ अमेरिकी अधिकाऱ्याने म्हटले.
प्रवाळ खडकांवर वाळू व सिमेंट ओतून चीनने तब्बल चार चौरस किलोमीटरचा कृत्रिम बेट निर्माण करीत आहे, असेही हा अधिकारी म्हणाला. दक्षिण चीन समुद्राच्या मालकीवरून चीनचे शेजारी देशांसोबत मतभेद आहेत. (वृत्तसंस्था)