चीनने दुसऱ्या देशात 'बळजबरी' बनवला लष्करी तळ; भारत-रशिया दोन्ही देशांचं वाढलं टेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 03:22 PM2024-07-16T15:22:21+5:302024-07-16T15:27:46+5:30

चीनने फसवणूक करून हा लष्करी तळ बांधल्याचा केला जातोय दावा

China built military base Tajikistan big setback India Russia Afghanistan | चीनने दुसऱ्या देशात 'बळजबरी' बनवला लष्करी तळ; भारत-रशिया दोन्ही देशांचं वाढलं टेन्शन

चीनने दुसऱ्या देशात 'बळजबरी' बनवला लष्करी तळ; भारत-रशिया दोन्ही देशांचं वाढलं टेन्शन

China Plan, India Russia: चीनने ताजिकिस्तानमध्ये लष्करी तळ बांधल्याची माहिती समोर आली आहे. पण चीनने हा तळ फसवणूक करून बांधला आहे असे सांगितले जात आहे. अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या ताजिकिस्तानमध्ये चीनने लष्करी तळ बांधल्याचे वृत्त आहे. चीन आणि ताजिकिस्तान या दोन्ही देशांनी अलीकडेच ताजिक-अफगाण सीमेजवळ गुप्त लष्करी तळाचे अस्तित्व नाकारले आहे. पण सॅटेलाइट छायाचित्रांसह टेलिग्राफच्या अहवालात चीनने एक गुप्त लष्करी तळ बांधल्याचे म्हटले आहे. भारत आणि रशिया यांच्यातील सुरक्षा संबंधांचा विचार करता, चीनचा हा तळ चर्चेचा मुद्दा ठरला आहे.

अहवालानुसार, १३ हजार फूट उंचीवर दुर्गम डोंगराळ भागात असलेल्या चिनी लष्करी तळावर निरीक्षणाचे टॉवर्स आणि चिनी सैनिकही तैनात आहेत. सूत्रांनी सांगितले की, अफगाणिस्तानमधील तालिबानच्या माघारीनंतर कथित दहशतवादविरोधी तळ बांधण्यात आला होता आणि त्यासाठीचा करार २०२१ मध्ये झाला. रशिया आणि भारत या दोन्ही देशांचा ताजिकिस्तानमध्ये मोठा हिस्सा आहे. मध्य आशियातील कोणताही चिनी तळ, विशेषत: ताजिकिस्तानजवळ अफगाण सीमेजवळ आणि पाकव्याप्त काश्मीर हा भारत आणि रशियासाठी तणावाचा विषय आहे.

रशियाचा ताजिकिस्तानमधील लष्करी तळ कायम आहे. मात्र भारताने या भागातील दहशतवादी धोक्यांचा सामना करण्यासाठी ताजिकिस्तानसोबत काम केले आहे. भारत ताजिकिस्तानमधील आयनी एअर बेस चालवतो. तेथे सुखोई देखील तैनात करण्यात आले होते. मात्र नंतर ही सुविधा बंद करण्यात आली. २००२ ते  २०१० दरम्यान भारताने हवाई तळाचे नूतनीकरण करण्यासाठी, धावपट्टीचा ३२०० मीटरने विस्तार करण्यासाठी आणि अत्याधुनिक नेव्हिगेशनल आणि हवाई संरक्षण उपकरणे स्थापित करण्यासाठी ७० दशलक्ष डॉलर्स खर्च केले.

Web Title: China built military base Tajikistan big setback India Russia Afghanistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.