चीनची 'कोरोना'आडून मोठी चाल; मोदी सरकारने उधळल्याने HDFC बँक वाचली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 11:42 AM2020-04-20T11:42:30+5:302020-04-20T12:23:14+5:30
लॉकडाऊनमुळे जवळपास सर्वच कंपन्यांचे शेअर्स पडले आहेत. यामुळे चीनने एफडीआयमधील पळवाटांचा फायदा उठवत शेअर बाजारात पैसा ओतण्यास सुरुवात केली आहे. HDFC च्या शेअरमध्ये ३२.२९ टक्क्यांची घसरण झाली आहे. CoronaVirus
नवी दिल्ली : कोरोनामुळे जगभरात पसरलेल्या मंदीवरून लवकरच चीन अमेरिकेचा ताबा घेईल, अशी भीती खुद्द अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनीच व्यक्त केलेली असताना आता भारतासाठीही धोक्याची घंटा वाजू लागली आहे. चीनची केंद्रीय बँक पीपल्स बँक ऑफ चायनाने गृहकर्ज देणाऱ्या भारतातील खासगी क्षेत्रातील दिग्गज कंपनी एचडीएफसीचे मोठ्या प्रमाणावर शेअर विकत घेतले आहेत. यानंतर मोदी सरकार अचानक तत्काळ सतर्क झाले असून चीनमधून येणाऱ्या एफडीआयवर बंदी आणण्यात आली आहे.
केंद्र सरकारने सांगितले आहे की, थेट परकीय गुंतवणूक करण्याआधी चीनला आधी सरकारची मंजुरी घ्यावी लागणार आहे. चीनच्या या बँकेने एचडीएफसी लिमिटेड (HDFC) चे तब्बल १.७५ कोटी शेअर ताब्यात घेतले आहेत. भारतात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. यामुळ भारताची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. याचा फायदा आता कोरोनाचा जन्मदाता चीन उठवू पाहत आहे. लॉकडाऊनमुळे जवळपास सर्वच कंपन्यांचे शेअर्स पडले आहेत. यामुळे चीनने एफडीआयमधील पळवाटांचा फायदा उठवत शेअर बाजारात पैसा ओतण्यास सुरुवात केली आहे. HDFC च्या शेअरमध्ये ३२.२९ टक्क्यांची घसरण झाली आहे. जानेवारीमध्ये हा शेअर २५०० रुपये होता, आता तो १६०० रुपयांवर आला आहे. याच कमी झालेल्या किंमतीचा फायदा चीनच्या केंद्रीय बँकेने उठविला आहे.
चीनने एचडीएफसीचे तब्बल पावणे दोन कोची शेअर खरेदी केले आहेत. चीनने मुद्दामहून कोरोना व्हायरस जगात पसरवला असल्याचे आरोप होत आहेत. मात्र, यानंतर चीनी ड्रॅगनची चाल पाहता भारतासाऱख्या एखाद्या देशाची अर्थव्यवस्था कमकुवत करून त्यावर व्यापारातून जमविलेले पैसे वापरून ताबा मिळविण्याचा हेतू असल्याचे समोर आले आहे.
केंद्रातील मोदी सरकारला चीनच्या या चालीची खबर लागताच मोठे पाऊल उचलत चीनकडून होणाऱ्या गुंतवणुकीवर अंकुश लावण्यात आला आहे. भारतीय कंपन्या चीनच्या ताब्यात न जाण्यासाठी चीनमधून येणाऱ्या गुंतवणुकीला परवानगी घ्यावी लागणार आहे. बीएसईकडून मिळालेल्या माहितीनुसार एचडीएफसीमध्ये चीनच्या या बँकेकडून १.०१ टक्के गुंतवणूक झाली आहे. एचडीएफसीमध्ये आधीपासूनच परदेशी कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. यामध्ये इनवेस्को ओपनहीमर डेव्हलपिंग मार्केट फंड (3.33%), सिंगापूर सरकार (3.23%) आणि व्हॅनगार्ड टोटल इंटरनॅशनल स्टॉक इंडेक्स फंडची (1.74%) गुंतवणूक आहे.
CoronaVirus क्रूर थट्टा! तुमचा मृत्यू झालाय, पैसे कसे देऊ? वृद्धेला बँक कर्मचाऱ्याचे उत्तर
काका मला वाचवा! सौदीची राजकुमारी तुरुंगात खितपत; क्राऊन प्रिन्ससोबत वाद
बाळासाहेब अन् उद्धव ठाकरेंच्या राज्यात हाच फरक; पालघर प्रकरणावरून नितेश राणेंची टीका