कोरोनाचा चीनमधील उत्पन्नावर परिणाम; वित्तीय महसुलात 4.8 टक्क्यांनी घट!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 02:31 PM2022-07-07T14:31:30+5:302022-07-07T14:32:03+5:30

china : कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी लागू करण्यात आलेल्या शून्य-कोविड धोरणाचाही चीनच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. 

china chinese mainland reports 94 covid 19 cases 39 in anhui 32 in shanghai | कोरोनाचा चीनमधील उत्पन्नावर परिणाम; वित्तीय महसुलात 4.8 टक्क्यांनी घट!

कोरोनाचा चीनमधील उत्पन्नावर परिणाम; वित्तीय महसुलात 4.8 टक्क्यांनी घट!

Next

बीजिंग : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना व्हायरस पसरत आहे. आरोग्य आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशात 94 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. यामध्ये अनहुई प्रांतातील 39 आणि शांघायमधील 32 प्रकरणांचा समावेश आहे. कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी लागू करण्यात आलेल्या शून्य-कोविड धोरणाचाही चीनच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. 

वित्त मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, चार महिन्यांत वित्तीय महसुलात 4.8 टक्क्यांनी घट झाली आहे.सिन्हुआ वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, एका दिवसापूर्वी मुख्य भूभाग चीनमध्ये कोरोना संसर्गाची 112 प्रकरणे नोंदवण्यात आली होती. प्रांतीय आरोग्य आयोगाच्या म्हणण्यानुसार, पूर्व चीनच्या अनहुई प्रांतात बुधवारी 39 पुष्टी झालेल्या कोरोना रुग्णांची आणि 128 लक्षणे नसलेल्या (कोरोनाची लक्षणे नसलेल्या) रुग्णांची पुष्टी झाली आहे. आणखी एक शहर असलेल्या सुझोऊ शहरांतर्गत सिक्सियन काउंटी आणि लिंगबी काउंटीमध्ये नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. एका दिवसापूर्वी सुझोऊमध्ये 81 कोरोना रुग्ण आढळले होते.

सिन्हुआ वृत्तसंस्थेनुसार, चीनचे औद्योगिक केंद्र शांघायमध्ये गेल्या 24 तासांत 22 लक्षणे नसलेल्या रुग्णांसह 54 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र, चीनच्या आरोग्य आयोगाने सांगितले की, गेल्या 24 तासांत एकूण 39 कोरोना रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या निवेदनात म्हटले आहे की, बुधवारपर्यंत चीनच्या मुख्य भूभागवर बरे झाल्यानंतर रुग्णालयातून सोडण्यात आलेल्या कोरोना रुग्णांची एकूण संख्या 220,265 वर पोहोचली आहे. 

दरम्यान, चीनमध्ये नवीन प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. डेली मेल या इंग्रजी वृत्तपत्राने दावा केला आहे की, मध्य चीनमध्ये कोरोना पुन्हा जोर धरत आहे, याठिकाणी देशातील पहिले प्रकरण दिसून आले होते. एप्रिलपासून लागू करण्यात आलेले निर्बंध शिथिल होताच पुन्हा एकदा कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. यामुळे लाखो लोकांना अनिवार्य चाचणी आणि नियमित लॉकडाऊनचा सामना करावा लागत आहे.

Web Title: china chinese mainland reports 94 covid 19 cases 39 in anhui 32 in shanghai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.