आता कुरापतखोर चीनचा थेट रशियावरच डोळा, या 'मोठ्या' शहरावर सांगितला दावा!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 07:13 PM2020-07-02T19:13:08+5:302020-07-02T19:19:00+5:30
रशियाचा अधिकांश व्यापार याच पोर्टवरून चालतो. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी येथेच जर्मनी आणि रशियन सैन्यात भीषण युद्ध झाले होते.
पेइचिंग -भारतासोबत लडाखमध्ये सीमा वाद वाढवणाऱ्या चीनने आता थेट रशियाच्याच व्लादिवोस्तोकवर आपला दावा सांगितला आहे. चीनमधील सरकारी वृत्त वाहिनी सीजीटीएनचे संपादक शेन सिवई यांनी हा दावा केला आहे. ते म्हणाले, रशियातील व्लादिवोस्तोक शहर हे 1860पूर्वी चीनचाच भाग होते. एवढेच नाही, तर या शहराला पूर्वी हैशेनवाई म्हटले जाईल, ते एकतर्फी संधी करून रशियाने चीनकडून हिसकावले, असेही त्यांनी म्हटले आहे.
सीजीटीएनच्या संपादकांचे म्हणणे महत्वाचे -
चीनमधील सर्वच माध्यमं सरकारी आहेत. यात काम करणारे लोक चीनी कम्युनिस्ट पक्षाच्या इशाऱ्यावरच लिखान करतात आणि बोलतात. चीनी माध्यमांत लिहिली गेलेली प्रत्येक गोष्ट तेथील सरकारचा विचार दर्शवते. यामुळे शेन सिवई यांचे ट्विट अत्यंत महत्वाचे मानले जात आहे. काही दिवसांपूर्वीच चीन आणि रशिया यांच्यात वादही निर्माण झाला होता.
पाणबुडीशी संबंधित महत्वाची फाइल चोरल्याचा आरोप -
काही दिवसांपूर्वी चीनच्या गुप्तचर संस्थेने पाणबुडीशी संबंधित टॉप सिक्रेट फाइल चोरल्याचा आरोप रशियाने केला होता. याप्रकरणी रशियाने आपल्या एका नागरिकालाही अटक केली होती. एवढेच नाही, तर त्याच्यावर देशद्रोहाचा आरोपही ठेवण्यात आला होता. संबंधित आरोपी हा रशियन सरकारमध्ये मोठ्या पदावर कार्यरत होता. त्यानेच ही फाईल चीनला सोपवली होती.
आशियातील या देशांना चीनपासून धोका -
आशियातील चीनच्या विस्तारवादी नीतीचा सर्वाधिक धोका भारताला आहे. याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे, भारत-चीन सद्यस्थिती. याशिवाय, चीन आणि जपान यांच्यात पूर्व चीन समुद्रातील बेटांवरून वाद सुरू आहे. नुकतेच जपानने एका चिनी पाणबुडीला आपल्या भागातून पिटाळून लावले होते. चीनने अनेक वेळा तैवानवर उघडपणे सैन्य कारवाईची धमकी दिली आहे. तसेच फिलिपाइन्स, मलेशिया आणि इंडोनेशियासोबतही चीनचा वाद आहे.
व्लादिवोस्तोक रशियन सैन्याचा मोठा अड्डा -
रशियाचे व्लादिवोस्तोक शहर हे प्रशांत महासागरात तैनात असलेल्या रशियन सैन्याचे मुख्य ठिकाण आहे. रशियाच्या उत्तर पूर्वेला असलेले हे शहर प्रिमोर्स्की क्राय राज्याची राजधानी आहे. हे शहर चीन आणि उत्तर कोरियाच्या सेमेजवळ आहे. व्यापारी आणि एतिहासिक दृष्टीने व्लादिवोस्तोक हे रशियाचे सर्वात महत्वाचे शहर आहे. रशियाचा अधिकांश व्यापार याच पोर्टवरून चालतो. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी येथेच जर्मनी आणि रशियन सैन्यात भीषण युद्ध झाले होते.
महत्त्वाच्या बातम्या -
भारतानंतर आता 'हा' देशही आक्रमक, चीनविरोधात मोर्चेबांधनीला केली सुरुवात
भारताकडे आहे 'अग्नीबाण', काही मिनिटांत बेचिराख होऊ शकतो चीन; 'ही' मोठी शहरं येतात थेट निशाण्यावर!