India and china standoff : भारतीय लष्कराने करार तोडला, सैनिकांवर केला हल्ला; आता चीन करतोय भलताच दावा!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 09:09 AM2020-06-20T09:09:32+5:302020-06-20T09:24:25+5:30
माध्यमांशी संवाद साधताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी 15 जूनला झालेल्या हिंसक चकमकीसाठी पुन्हा एकदा भारतालाच जबाबदार धरले आहे. ते म्हणाले 'गलवान खोरे हे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या चीनी भागात येते.
पेइचिंग :चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी दावा केला, की गलवान खोरे हे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (एलएसी) चिनी हद्दीत येते. एवढेच नाही, तर 15 जूनच्या रात्री भारतीय सैनिकांनीच करार तोडून एलएसी ओलांडली आणि चिनी सैनिकांवर हल्ला केला.
चिनने गलवान खोऱ्यावर दावा करण्याच्या एक दिवस आधीच भारताने गलवान घाटीवरील चिनी सेन्याच्या सार्वभौमत्वाचा दावा फेटाळून लावला होता. तसेच आपल्या हालचाली एलएसीच्या आतच ठेवा, असे सांगितले होते. गलवान खोऱ्यातील चीनचा दावा भारताने आधिच फेटाळून लावला आहे. भारताने म्हटले आहे, की अशा प्रकारचा खोटा दावा करणे, 6 जूनला झालेल्या उच्च स्तरीय सैन्य बैठकीत झालेल्या सहमतीविरोधात आहे.
चीन म्हणतोय गलवान खोरे आमचा भाग -
माध्यमांशी संवाद साधताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी 15 जूनला झालेल्या हिंसक चकमकीसाठी पुन्हा एकदा भारतालाच जबाबदार धरले आहे. ते म्हणाले 'गलवान खोरे हे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या चीनी भागात येते. अनेक वर्षांपासून तेथे चीनी सैनिक गस्त घालत आहेत.
भारताने करार तोडला -
चीनने दावा केला, की सोमवारी रात्री भारतीय सैनिक करार तोडून चीनच्या सीमेत घुसले आणि त्यांनी त्यांच्याशी बोलण्यासाठी गेलेल्या चिनी अधिकाऱ्यांवर आणि सैनिकांवर हल्ला केला. यानंतर तेथे हिंसक चकमक उडाली आणि सैन्याचे मोठे नुकसान झाले. भारतीय सेनिकांनी दोन्ही देशांतील कराराचे, तसेच आंतरराष्ट्रीय संबंध नियंत्रित करणाऱ्या मुलभूत मानदंडांचे उल्लंघन केले आहे.
गलवानमधील विश्वासघातकी कृत्यानंतर, आता चीन दाखवतोय 'या' महाविनाशक बॉम्बची भीती; पाहा VIDEO
लवकरात लवकर बोलणी व्हावी -
चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाइटवरील एका प्रेस नोटमध्ये झाओ यांनी म्हटले आहे, या भागातील परिस्थितीवर मात करण्यासाठी लवकरात लवकर कमांडर स्तरावरील दुसरी बैठक व्हायला हवी. भारत आणि चिनी राजदूत तसेच सैन्य तणाव कमी करण्याच्या दृष्टीने चर्चा करत आहेत.
पेंगाँग सरोवराचे 'फिंगर्स'?, यांच्यामुळेच भारत-चीन आले आहेत 'आमने-सामने'
गेल्या 15 जूनच्या रात्री गलवान खोऱ्याजवळ भारतीय जवान आणि चीनी सैनिकांत चकमक झाली. यामुळे सीमेवरील तणाव अधिक वाढला आहे. गेल्या महिनाभरापासून लडाखच्या अनेक भागांत चीन आणि भारताचे सैन्य समोरासमोर आहे. चर्चेनंतरही चीन दिलेला शब्द पाळायला तयार नाही. त्यांनी भारतीय सैनिकांनाही धोका दिला आहे. चर्चा सुरू असतानाही चीन सीमेवर सैनिक आणि शस्त्रांचा साठा वाढवतच होता.