ड्रॅगन संपूर्ण एव्हरेस्ट गिळंकृत करायच्या मार्गावर; नेपाळनं उठवला आवाज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 07:32 AM2020-05-11T07:32:24+5:302020-05-11T07:33:31+5:30

जगातील सर्वात उंच शिखर चीनच्या तिबेट स्वायत्त प्रदेशात आहे. या छायाचित्रांच्या माध्यमातून संपूर्ण एव्हरेस्टवर चीननं दावा केला आहे. 

china claims whole mountain everest vrd | ड्रॅगन संपूर्ण एव्हरेस्ट गिळंकृत करायच्या मार्गावर; नेपाळनं उठवला आवाज

ड्रॅगन संपूर्ण एव्हरेस्ट गिळंकृत करायच्या मार्गावर; नेपाळनं उठवला आवाज

Next
ठळक मुद्देचीनच्या सरकारी टीव्ही चॅनल चायना ग्लोबल टेलिव्हिजन नेटवर्क (सीजीटीएन)च्या अधिकृत संकेतस्थळाने माऊंट एव्हरेस्टची काही छायाचित्रे प्रकाशित केली आहेत.तसेच ट्विट करत म्हटले आहे की, "शुक्रवारी माउंट चोमोलुंग्मावरील सूर्यप्रकाशाचे उत्तम दृश्य. याला माऊंट एव्हरेस्ट म्हणूनही ओळखले जाते. जगातील सर्वात उंच शिखर चीनच्या तिबेट स्वायत्त प्रदेशात आहे. या छायाचित्रांच्या माध्यमातून संपूर्ण एव्हरेस्टवर चीननं दावा केला आहे. 

नवी दिल्ली: जगभरात कोरोनानं थैमान घातलेलं असताना चीनच्या कुरापती काही थांबायचं नाव घेत नाहीयेत. चीनच्या सरकारी टीव्ही चॅनल चायना ग्लोबल टेलिव्हिजन नेटवर्क (सीजीटीएन)च्या अधिकृत संकेतस्थळाने माऊंट एव्हरेस्टची काही छायाचित्रे प्रकाशित केली आहेत. तसेच ट्विट करत म्हटले आहे की, "शुक्रवारी माउंट चोमोलुंग्मावरील सूर्यप्रकाशाचे उत्तम दृश्य. याला माऊंट एव्हरेस्ट म्हणूनही ओळखले जाते. जगातील सर्वात उंच शिखर चीनच्या तिबेट स्वायत्त प्रदेशात आहे. या छायाचित्रांच्या माध्यमातून संपूर्ण एव्हरेस्टवर चीननं दावा केला आहे. 

चीन आणि नेपाळमध्ये एव्हरेस्टच्या अर्ध्या भागाचं विभाजन
तज्ज्ञांच्या मते, चीन आणि नेपाळ यांनी 1960मध्ये सीमा विवाद सोडविण्यासाठी करार केला होता. त्यानुसार एव्हरेस्टचे दोन भाग केले जातील. त्याचा दक्षिणेकडील भाग नेपाळजवळील तर उत्तर भाग तिबेट स्वायत्त प्रदेशाजवळील असेल. तिबेटवर चीनचा कब्जा आहे.
सीजीटीएनच्या ट्विटवर जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील चिनी स्टडीजचे प्रोफेसर श्रीकांत कोंडापल्ली म्हणतात, "यात काही नवीन नाही, तिबेट आणि एव्हरेस्टवर चीन कब्जा करून आपलं स्थान अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्नशील आहे. तिबेटकडे एव्हरेस्टचा अत्यंत दुर्गम भाग आहे आणि त्याचा चीनकडून फारसा उपयोग होत नाही. तिथून गिर्यारोहक चढत नाहीत. त्या दिशेने एक मोठी चढण आहे आणि व्हिसा मिळवण्याचीदेखील एक समस्या आहे.

5 जी नेटवर्कच्या माध्यमातून संपूर्ण हिमालयावर देखरेख ठेवण्याची योजना
एव्हरेस्टवर 5जी नेटवर्क बसवणार असल्यानं संबंधित तज्ज्ञ चिंतित आहेत. कोंडापल्ली म्हणाले की, चीनने एव्हरेस्टवर 5जी नेटवर्क लावले आहे. ही एक विवादास्पद चाल आहे, कारण कदाचित संपूर्ण हिमालय त्याच्या नियंत्रणाखाली येऊ शकेल. हे 5 जी नेटवर्कदेखील एक सैन्य हालचालींचा भाग आहे, कारण ते समुद्रसपाटीपासून 8,000 मीटर उंचीवर स्थित आहे. यामुळे चीन, भारत, बांगलादेश आणि म्यानमारवर लक्ष ठेवू शकेल. येत्या काही दिवसांत तो या तंत्रज्ञानाचा फायदा हिमालयीन प्रदेशात घेऊ शकेल. एव्हरेस्टवरील बहुतांश मोहीम आणि पर्यटन उपक्रम नेपाळमधील भागातून होतात. आता तंत्रज्ञानाच्या मदतीने चीन तिबेटच्या दिशेने असलेल्या एव्हरेस्टचा काही भाग विकसित करीत आहे. अधिकृत टीव्ही चॅनल वेबसाइटवर चीनने एव्हरेस्टला स्वतःचे घोषित करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

चीन अन् नेपाळच्या द्विपक्षीय संबंधात येणार कटुता
चीनच्या या महत्त्वाकांक्षी कारणामुळे नेपाळबरोबर असलेल्या त्यांच्या द्विपक्षीय संबंधात कटुता येऊ शकते. नेपाळमध्ये याविरोधात आवाज उठू लागले आहेत. नेपाळचे संपादक आणि प्रकाशक कनक मणी दीक्षित यांनी ट्विट केले की, 'चोमोलुंग्मा-सागरमाथा-एव्हरेस्ट हे नेपाळ आणि तिबेट चीनमधील अर्धे फुटलेले आहे. ”एव्हरेस्टला नेपाळमध्ये सागरमाथा आणि तिबेटमधील चोमोलुन्ग्मा म्हणतात.

Web Title: china claims whole mountain everest vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.