विकृत चीन! भारतातील पेटत्या चितांवरून उडविली खिल्ली; कम्युनिस्ट पार्टीची जगभर नाचक्की
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 09:25 AM2021-05-03T09:25:06+5:302021-05-03T09:26:14+5:30
China Posts Obnoxious Picture Comparing Its Rocket Launch With Burning Indian Pyres: चीनची सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीच्या एका सोशल मीडिया अकाऊंटवरून भारतातील कोरोना संकटाची खिल्ली उडविण्यात आली. भारतात चिता जळत आहेत आणि चीन अंतराळात स्पेस स्टेशन तयार करत आहे, असे लिहिण्यात आले होते.
बिजिंग : भारताला कोरोनाच्या संकटात मदत करण्याचा हात पुढे करून चीन जगासमोर सहानुभूती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतू चीनचा पुन्हा एकदा विकृत चेहरा समोर आला आहे. कोरोनामुळे मृत पावलेल्यांच्या स्मशानभूमीत जळणाऱ्या सरणावरून चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या पक्षाने भारताची खिल्ली उडविली. मात्र, हा प्रकार त्यांच्याच अंगलट आला आणि जगभरात चीनला नाचक्कीचा सामना करावा लागला. (The image, titled “China lighting a fire versus India lighting a fire” showed the launch of Tianhe space module and its fuel burnoff compared with a mass outdoor cremation in India )
चीनची सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीच्या एका सोशल मीडिया अकाऊंटवरून भारतातील कोरोना संकटाची खिल्ली उडविण्यात आली. भारतात चिता जळत आहेत आणि चीन अंतराळात स्पेस स्टेशन तयार करत आहे, असे लिहिण्यात आले होते.
चीनची मायक्रो ब्लॉगिंग साईट वीबोवर कम्युनिस्ट पार्टीच्या सेंट्रल पोलिटिकल अँड लीगल अफेअरचे अकाऊंट आहे. यावर हे वादग्रस्त विधान फोटोंसह पोस्ट करण्यात आले होते. यानंतर सोशल मीडियावर कम्युनिस्ट पक्षाला त्यांच्याच लोकांनी घेरले. एका फोटोत चीन रॉकेट लाँच करत असताना दाखविले होते, तर दुसऱ्या फोटोत भारतातील स्मशानभूमीतील पेटत्या चिता दाखविण्यात आल्या होत्या. या फोटोचे कॅप्शन 'चीनमध्ये आग जळणे विरुद्ध भारतात आग जळणे' असे होते.
Many Chinese people worry that the emergency supplies such as oxygen concentrators, ventilators that China delivered to India won't be used to save poor Indian patients, instead they are to meet the needs of the rich people in the country.
— Hu Xijin 胡锡进 (@HuXijin_GT) May 2, 2021
लोकांनी चीनच्या या पोस्टवर खूप तीव्र प्रतिक्रिया दिल्या आणि कम्युनिस्ट पक्षावार असंवेदनशील असल्याचे आरोप केले. चीनच्या सरकारी वृत्तपत्राचे ग्लोबल टाईम्सचे संपादक हू शिजिन यांनी लिहिले की, आपल्याला आताच्या काळात भारतासाठी मानवतेचा झेंडा हाती घ्यायला हवा. मात्र, यानंतर हू शिजिन यांचा खरा चेहराही समोर आला. चीनला याचे टेन्शन आहे की, जर चीनने ऑक्सिजन कंसट्रेटर्स आणि व्हेंटिलेटरसारख्या वैद्यकीय वस्तू भारताला दिल्या तर भारत त्याचा वापर गरीबांसाठी करायचे सोडून श्रीमंतांना वाचविण्यासाठी करेल, असे ट्विट केले. एकप्रकारे त्य़ांनी भारतीय यंत्रणेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
भारतासाठी चीनमध्ये 24 तास काम सुरुय...
भारतातील चीनच्या राजदूतांनी ग्लोबल टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये दावा केला आहे की, भारताच्या मागणीनुसार चीन मदत करण्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न करणार आहे. भारताने 40 हजार ऑक्सिजन जनरेटरची ऑर्डर दिली आहे, त्याचे उत्पादन सुरु आहे. चिनी कंपन्या लवकरच भारताला मोडिकल साहित्याचा पुरवठा करतील. यासाठी 24 तास काम सुरु आहे.