Corona Virus : बापरे! चीनच्या सिचुआन प्रांतात कोरोनाचं तांडव; 7 कोटी लोक झाले कोरोना पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 04:48 PM2023-01-03T16:48:22+5:302023-01-03T16:53:59+5:30
China Corona Virus : सिचुआनमध्ये 64 टक्के लोकांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे आणि 28 टक्के लोकांना संसर्ग झाल्याचा संशय आहे.
कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. अनेक देशामध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने चीनमधील सिचुआनमध्ये एक सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात असे म्हटले आहे की, सिचुआनमध्ये 64 टक्के लोकांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे आणि 28 टक्के लोकांना संसर्ग झाल्याचा संशय आहे. एकत्रितपणे ते जवळपास 92 टक्के आहे. त्याच वेळी, सिचुआनमधील 70 टक्के लोकांमध्ये तापाची लक्षणे आढळून आली आहेत.
सर्वेक्षणात असे म्हटले आहे की, एकट्या सिचुआन प्रांतात सुमारे सात कोटी लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. चीनमध्ये कोरोनाने किती कहर केला आहे, याचा अंदाज सिचुआन प्रांतात आलेल्या प्रकरणांवरूनच लावता येईल. अलीकडेच, चीनमध्ये एका दिवसात 3 कोटीहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे.
ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशननंतर जपान, अमेरिका, दक्षिण कोरिया आणि ब्राझीलमध्येही कोरोनाचा विस्फोट झाला आहे. गेल्या 7 दिवसांत जगभरात कोरोनाचे 30 लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, महामारीमुळे 9847 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. फक्त जपानमध्ये 7 दिवसांत 2188 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. कोरोनाच्या आकडेवारीवर नजर ठेवणारी संस्था वर्ल्डोमीटर्सच्या मते, गेल्या 7 दिवसांत जगात कोरोनाचे 3,044,999 रुग्ण आढळले आहेत. तर 9,847 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यादरम्यान 2,545,786 लोक बरेही झाले आहेत.
चीनच्या शेजारच्या तैवानमध्ये 185947 प्रकरणे आढळून आली आहेत. या दरम्यान 174 लोकांचा मृत्यू झाला आहे. हाँगकाँगमध्ये 291 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 164182 प्रकरणे आढळून आली आहेत. कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जर्मनी (157,928), फ्रान्स (147,584), अर्जेंटिना (72,558), इटली (67,228) आणि ऑस्ट्रेलिया (46,439) मध्येही कोरोनाची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. जर्मनीमध्ये 7 दिवसांत 697 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. फ्रान्समध्ये 808, इटलीमध्ये 430 आणि ऑस्ट्रेलियामध्ये 106 जणांचा मृत्यू झाला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"