China Coronavirus : चीनमध्ये 'कोरोना'चा कहर, संक्रमण रोखण्यासाठी नोटांची सफाई?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 01:14 PM2020-02-18T13:14:48+5:302020-02-18T13:37:35+5:30

कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत तब्बल 1770 लोकांचा मृत्यू झाला असून 70,548 पेक्षा जास्त लोकांना आतापर्यंत त्याची लागण झाली आहे.

China Coronavirus china cleans locks away banknotes to stop virus spread | China Coronavirus : चीनमध्ये 'कोरोना'चा कहर, संक्रमण रोखण्यासाठी नोटांची सफाई?

China Coronavirus : चीनमध्ये 'कोरोना'चा कहर, संक्रमण रोखण्यासाठी नोटांची सफाई?

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत तब्बल 1770 लोकांचा मृत्यू झाला.कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये यासाठी चीनने नोटांची स्वच्छता करण्यास सुरुवात केली आहे.अल्ट्राव्हॉयलेट किरणांनी नोटा स्वच्छ करण्यात येत आहेत.

बीजिंग - चीनमध्ये वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत तब्बल 1770 लोकांचा मृत्यू झाला असून 70,548 पेक्षा जास्त लोकांना आतापर्यंत त्याची लागण झाली आहे. चीनमध्ये कोरोना व्हायरसने (कोविड-19) थैमान घातले आहे. चीनशिवाय अन्य देशांत तीस ठिकाणी कोरोनाची साथ पसरली आहे. कोरोनाचा व्हायरसची लागण होऊ नये यासाठी चीन सरकार अत्यंत प्रयत्नशील आहे. सर्वच स्तरातून जोरदार प्रयत्न हे केले जात आहेत. 

कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये यासाठी चीनने नोटांची स्वच्छता करण्यास सुरुवात केली आहे. सार्वजनिक ठिकाणी वापरण्यात आलेल्या नोटा या चलनातून नष्ट करण्यात येणार आहेत तसेच जानेवारी महिन्यानंतर बाजारात वितरित करण्यात आलेल्या नोटांना जमा करण्यात येत आहे. अल्ट्राव्हॉयलेट किरणांनी त्या नोटा स्वच्छ करण्यात येत आहेत. त्यानंतर त्यांना 14 दिवस त्यांना स्टॉकमध्ये वेगळे ठेवण्यात येणार आहेत. कोरोनाचा व्हायरसचा संसर्ग होऊ नये यासाठी चीनने हा निर्णय घेतला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

चीनमधील रुग्णालये, बाजारपेठा आणि अन्य सार्वजनिक ठिकाणांहून संसर्ग झालेल्या नोटा चलनात असल्याचा धोका आहे. त्यातून कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या नोटा बँकेने जमा करून घेतल्या आहेत. या नोटा नष्ट करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. सेंट्रल बँकेचे डेप्युटी गर्व्हनर फैन यिफेई यांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 जानेवारीपासून आतापर्यंत सगळ्या चीनमध्ये 600 बिलियन युआन (जवळपास 6.11 लाख कोटी रुपये) मूल्यांचा नोटा वितरीत करण्यात आल्या आहेत. त्यामधील 4 बिलियन युआन (जवळपास 28,581 कोटी रुपये ) मूल्यांच्या नोटा फक्त वुहान प्रांतात पाठवण्यात आल्या आहेत.

वुहान शहरातून कोरोनाची साथ जगभरात पसरली आहे. मात्र आता चीनच्या प्रयोगशाळेमध्ये कोरोना व्हायरसची निर्मिती झाल्याची चर्चा सुरू आहे. वुहानमधील फिश मार्केट येथील एका सरकारी प्रयोगशाळेतून हा कोरोनाचा व्हायरस पसरला असल्याची माहिती मिळत आहे. चीनमधील सरकारी साऊथ चायना युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नोलॉजीनुसार, हुबेई प्रातांत वुहान सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (WHDC) ने हा व्हायरसची निर्मिती केली असावी. शास्त्रज्ञ बोताओ शाओ आणि ली शाओ यांच्या दाव्यानुसार या प्रयोगशाळेत संसर्गजन्य रोग पसरवू शकतील अशा काही प्राण्यांना ठेवण्यात आले होते. यामध्ये 605 वटवाघळांचा समावेश होता. याच प्रयोगशाळेतून कोरोना व्हायरसची निर्मिती झाली असावी अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

कोरेगाव-भीमाचा तपास केंद्राकडे दिलेला नाही, यापुढेही देणार नाही- मुख्यमंत्री

China Coronavirus : धक्कादायक! चीनच्या प्रयोगशाळेमध्ये कोरोना व्हायरसची निर्मिती?

शिवसेना बदलली?... 'नाणार'च्या सामनातील जाहिरातीवर उद्धव ठाकरेंचं 'रोखठोक' विधान

डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याआधी ४५ कुटुंबांना घरं रिकामी करण्याचे आदेश

राजस्थानमध्ये 85 मोरांचा संशयास्पद मृत्यू, पक्षीमित्रांकडून हळहळ

 

Web Title: China Coronavirus china cleans locks away banknotes to stop virus spread

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.