China Coronavirus: भावा, हीच तर आपली मैत्री; पंतप्रधान मोदींच्या 'त्या' पत्राला चीनने दिलं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 05:53 PM2020-02-10T17:53:24+5:302020-02-10T17:54:07+5:30
भारत आणि चीन यांच्यात सीमेवर तणाव असताना यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनला लिहिलेलं पत्र महत्त्वपूर्ण मानलं जात आहे.
बीजिंग - चीनमध्ये सध्या कोरोना व्हायरसचं संकट मोठ्या प्रमाणात पसरत असून हजारो लोक या व्हायरसच्या कचाट्यात सापडले आहेत. यातच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला पत्र लिहून भारत चीनची मदत करेल असं सांगितलं. यावर चीनने भारताचं कौतुक करत तुम्ही करत असलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत. पंतप्रधान मोदींच्या या पत्रामुळे चीनशी असलेल्या भारताच्या मैत्रीचे प्रतिबिंब उमटले असं सांगितले आहे.
भारत आणि चीन यांच्यात सीमेवर तणाव असताना यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनला लिहिलेलं पत्र महत्त्वपूर्ण मानलं जात आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग म्हणाले की, कोरोना विषाणूविरूद्ध चीनसोबत लढा देण्यास भारताच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. माध्यमाशी बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदींकडून आलेल्या पत्राचा उल्लेख केला. भारताच्या सद्भावनाचे हे पाऊल चीनशी असलेल्या त्याच्या मैत्रीचे प्रदर्शन करतो असं ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिनी अध्यक्ष शी जिनपिंग यांना पत्र लिहून कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी भारत मदत करण्यास तयार आहे. या पत्रात मोदींनी कोरोना व्हायरसच्या विरोधात आम्ही चीनमधील लोकांच्यासोबत आहोत. त्याचसोबत चीनच्या हुबेई प्रांतात अडकलेल्या ६५० भारतीयांना एअरलिफ्ट करण्यास मदत केल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी चीनफिंग यांचे कौतुकही केले.
हवेच्या माध्यमातून लोकांमध्ये पसरतोय कोरोना व्हायरस; शांघाय अधिकाऱ्यांचा दावा
भारताचा शेजारील देश चीन सध्या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाने पीडित आहे. चीनमध्ये या विषाणूमुळे जवळपास 900 लोकांचा मृत्यू झाला आहे. चीनच्या हुबेई प्रांतात सर्वात जास्त लोकांना कोरोना व्हायरसने ग्रासले आहे. या प्रांताची राजधानी वुहानची अतिशय वाईट परिस्थिती आहे. हा व्हायरस पसरू नये यासाठी येथील नागरिकांना घरामध्येच कैद्यासारखं राहावं लागत आहे.
कोरोना विषाणूबाबत धोक्याचा इशारा देणाऱ्या डॉक्टरचा मृत्यू
दरम्यान, चीनमध्ये मोठ्या प्रमाणात पसरलेल्या कोरोना व्हायरसबाबत आणखी एक खुलासा झाला आहे. ज्यामुळे या व्हायरसची तीव्रता प्रकर्षणाने जाणवू शकते. कोरोना विषाणू आता सूक्ष्म हवेमध्ये मिसळून हवेच्या माध्यमातून दुसर्या व्यक्तीस हा रोग संक्रमित करीत आहे, ज्याला एयरोसोल ट्रान्समिशन म्हणून ओळखले जाते असा दावा शांघायमधील अधिकाऱ्यांनी केला आहे.
धक्कादायक! अवघ्या 15 सेकंदात 'कोरोना'ची लागण; 722 जणांचा मृत्यू