China Coronavirus : 'कोरोना'चा कहर! जगातील 500 श्रीमंत व्यक्तींचे 444 अब्ज डॉलरचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2020 10:00 AM2020-03-01T10:00:33+5:302020-03-01T10:20:54+5:30
China Coronavirus: कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेलाही धक्का बसला आहे.
बीजिंग - चीनमध्ये वेगाने पसरणाऱ्या कोरोनाने जगाला विळखा घातला आहे. जगभरात आतापर्यंत 2800 लोकांचा मृत्यू झाला असून 83 हजार लोकांना संसर्ग झाला आहे. चीनपुरता हा व्हायरस मर्यादित नसून जगातील सुमारे 48 देशांतील लोकांना त्याची लागण झाली आहे. कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे.कोरोना व्हायरसने आता जगालाच आपल्या कवेत घेण्यास प्रारंभ केल्याने जगभरामध्ये भीतीचे वातावरण आहे. या भीतीने आशियातील सर्वच शेअर बाजारांमध्ये तीव्र घसरण झाली. कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेलाही धक्का बसला आहे. शेअर बाजार घसरल्यामुळे गेल्या काही दिवसांत जगातील 500 श्रीमंत व्यक्तींचे 444 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीतील अॅमेझॉनचे जेफ बेजोस, मायक्रोसॉफ्टचे बिल गेटस्, फेसबुकचे मार्क झुकेरबर्ग आणि एसव्हीएमएचचे अध्यक्ष बर्नार्ड अरनॉल्ट यांना तोटा झाला आहे. शेअर मार्केट डाऊ जोन्सचा औद्योगिक सरासरी निर्देशांक 12 टक्क्यांनी घसरला आहे. 2008 आर्थिक संकटानंतर अशी स्थिती पहिल्यांदाच दिसून आली. यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. 'ब्लूमबर्ग' च्या रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
जेफ बेजोस
शेअर बाजारातील घसरणीचा जगातील सर्वात श्रीमंत उद्योजक अॅमेझॉनचे प्रमुख जेफ बेजोस यांना फटका बसला आहे. जेफ बेजोस यांच्या मालमत्तेत 11.9 अब्ज डॉलर्सची घसरण झाली.
बिल गेट्स
मायक्रोसॉफ्टचे प्रमुख बिल गेट्स यांच्या मालमत्तेत 10 अब्ज डॉलर्सची घट झाली आहे.
बर्नाड अरनॉल्ट
बर्नाड अरनॉल्ट यांच्या संपत्तीत 9.1 अब्ज डॉलर्सची घट झाली आहे.
एलन मस्क
एलन मस्क यांची मालमत्ता 9 अब्ज डॉलर्सनी कमी झाली.
वॉरेन बफे
वॉरेन बफे यांना मोठे नुकसान सहन करावं लागलं. बफे यांच्या मालमत्तेत 8.8 अब्ज डॉलर्सची घसरण झाली आहे.
फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांना देखील फटका बसला आहे. झुकेरबर्ग यांची मालमत्ता 6.6 अब्ज डॉलर्सने कमी झाली.
'कोरोना'मुळे अंबानी, अदानी झाले 'गरीब'; बघा, किती कोटींनी घटली संपत्ती
देशातील आणि आशिया खंडातील सर्वात श्रीमंत उद्योजक/ व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानींना 5 बिलियन्स डॉलर म्हणजे 5 अब्ज अमेरिकन डॉलरचे नुकसान झाले आहे. यंदाच्या वर्षात त्यांच्या संपत्तीत एवढी मोठी घट झाली आहे. आदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला यांनाही 884 दशलक्ष डॉलरचे नुकसान सहन करावे लागणार आहे. तसेच, आयटी क्षेत्रातील नामवंत अझीम प्रेमजी यांच्या संपत्तीतही 869 दशलक्ष अमेरिकन डॉलरचे नुकसान झाले आहे. तर, अदानी यांनाही केवळ 2 महिन्यात 496 दशलक्ष डॉलरचा फटका बसला आहे.
उदय कोटक आणि सन फार्माचे दिलीप संघवी यांनाही मोठं नुकसान सोसावं लागलं आहे. विशेष म्हणजे या सर्वच उद्योजकांना गेल्या 15 दिवसांतच सर्वाधिक आर्थिक नुकसान सहन करावं लागलं आहे. मुंबई शेअर बाजारातील निर्देशांक जवळपास 3000 अंकांनी कमी झाला आहे. 12 फेब्रवारीपासून होत असलेली निर्देशांकांची घसरण अद्यापही सुरुच आहे. शेअर बाजारातील दलालांनाही कोरोना व्हायरसमुळे नुकसान झाले आहे. गुंतवणुकदारांच्या खिशातील 11.52 लाख कोटी रुपयांची संपत्ती गायब झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
संतापजनक! मुलाशी फोनवर बोलते म्हणून कुटुंबियांची भरचौकात मुलीला मारहाण, दिली भयंकर शिक्षा
"अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यासाठी घटना सार्वजनिक दृष्टिपथात होणे आवश्यक"
दीड लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्यापासून जमा होणार पैसे
मेलानिया यांच्या ट्विटमुळे ‘हॅप्पीनेस क्लास’ जगभरात; केजरीवाल सरकारच्या उपक्रमाचे कौतुक