China Coronavirus : 'कोरोना' चा भारताला फटका; औषधांच्या किमती वाढल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 02:48 PM2020-02-18T14:48:08+5:302020-02-18T14:57:56+5:30

China Coronavirus : कोरोना व्हायरसचा फटका हा जगभरातील अनेक कंपन्यांना बसला आहे. कोरोनामुळे भारतातील औषधांच्या किमती वाढल्या आहेत.

China Coronavirus impact paracetamol other drugs medicine prices jump in india | China Coronavirus : 'कोरोना' चा भारताला फटका; औषधांच्या किमती वाढल्या

China Coronavirus : 'कोरोना' चा भारताला फटका; औषधांच्या किमती वाढल्या

Next
ठळक मुद्देकोरोना व्हायरसमुळे भारतात पॅरासीटामॉलसह अनेक औषधांच्या किमतीत 40 ते 70 टक्क्यांची वाढ झाली.औषधांच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून वेदनाशामक औषधांच्या किमतीत वाढ झाली.अझिथ्रोमायसिन या अँटिबायोटिक्सची किंमत 70 टक्क्यांनी वाढली आहे.

बीजिंग - चीनमध्येकोरोना व्हायरसने कहर केला आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे 1770 लोक मृत्युमुखी पडले असून 70,548 पेक्षा जास्त लोकांना त्याची लागण झाली आहे. चीनपुरता हा व्हायरस मर्यादित नसून जगातील सुमारे 30 देशांतील लोकांना त्याची लागण झाली आहे. संसर्ग होऊ नये, यासाठी चीनने तर दोन राज्यांतील लोकांना अन्य राज्यांमध्ये जाण्यासच बंदी घातली आहे. काही शहरांमधील लोकांना घराबाहेर पडायलाही बंदी आहे. कोरोना व्हायरसचा फटका हा जगभरातील अनेक कंपन्यांना बसला आहे. कोरोनामुळे भारतातील औषधांच्या किमती वाढल्या आहेत.

कोरोना व्हायरसमुळे भारतात पॅरासिटामॉलसह अनेक औषधांच्या किमतीत 40 ते 70 टक्क्यांची वाढ झाली आहे. औषधांच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून वेदनाशामक औषधांच्या किमतीत वाढ झाली आहे. झायड्स कॅडीला या फार्मा कंपनीचे अध्यक्ष पंकज पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या पॅरासिटामॉलची किंमत जवळपास 40 टक्के वाढली आहे. तर अझिथ्रोमायसिन या अँटिबायोटिक्सची किंमत 70 टक्क्यांनी वाढली आहे. येत्या काही दिवसात कच्चा मालाचा पुरवठा सुरळीत झाला नाही तर अडचण होऊ शकते. 

चीनमध्ये कोरोनामुळे अनेक कंपन्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. भारतात औषधांच्या निर्मितीसाठी चीनमधून मोठ्या प्रमाणात कच्चा माल आयात केला जातो. मात्र कोरोनामुळे तेथील उत्पादन पूर्णपणे ठप्प झाले आहे. परिणामी इतर देशांना होणारा पुरवठा खंडीत झाला आहे. औषध निर्मिर्तीतील काही घटकांचा पुरवठा कमी झाल्याने किंमतीमध्ये वाढ झाली आहे. चीनमध्ये कोरोना व्हायरसने (कोविड-19) थैमान घातले आहे. चीनशिवाय अन्य देशांत तीस ठिकाणी कोरोनाची साथ पसरली आहे. कोरोनाचा व्हायरसची लागण होऊ नये यासाठी चीन सरकार अत्यंत प्रयत्नशील आहे. सर्वच स्तरातून जोरदार प्रयत्न हे केले जात आहेत. 

कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये यासाठी चीनने नोटांची स्वच्छता करण्यास सुरुवात केली आहे. सार्वजनिक ठिकाणी वापरण्यात आलेल्या नोटा या चलनातून नष्ट करण्यात येणार आहेत तसेच जानेवारी महिन्यानंतर बाजारात वितरित करण्यात आलेल्या नोटांना जमा करण्यात येत आहे. अल्ट्राव्हॉयलेट किरणांनी त्या नोटा स्वच्छ करण्यात येत आहेत. त्यानंतर त्यांना 14 दिवस त्यांना स्टॉकमध्ये वेगळे ठेवण्यात येणार आहेत. कोरोनाचा व्हायरसचा संसर्ग होऊ नये यासाठी चीनने हा निर्णय घेतला आहे. चीनमधील रुग्णालये, बाजारपेठा आणि अन्य सार्वजनिक ठिकाणांहून संसर्ग झालेल्या नोटा चलनात असल्याचा धोका आहे. त्यातून कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

China Coronavirus : चीनमध्ये 'कोरोना'चा कहर, संक्रमण रोखण्यासाठी नोटांची सफाई?

China Coronavirus : धक्कादायक! चीनच्या प्रयोगशाळेमध्ये कोरोना व्हायरसची निर्मिती?

इंदोरीकर महाराजांची दिलगिरी; वाचा डॉक्टर, शिक्षक, माता-भगिनींना लिहिलेलं पत्र

कोरेगाव-भीमाचा तपास केंद्राकडे दिलेला नाही, यापुढेही देणार नाही- मुख्यमंत्री

शिवसेना बदलली?... 'नाणार'च्या सामनातील जाहिरातीवर उद्धव ठाकरेंचं 'रोखठोक' विधान

डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याआधी ४५ कुटुंबांना घरं रिकामी करण्याचे आदेश

 

Web Title: China Coronavirus impact paracetamol other drugs medicine prices jump in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.