डिस्नेलँडमध्ये फिरत होते शेकडो लोक अन् चीननं लॉकडाऊन जाहीर केलं; सगळे अडकले, पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 05:15 PM2022-11-01T17:15:48+5:302022-11-01T17:16:49+5:30

चीनमध्ये सध्या कोरोना व्हायरसमुळे पुन्हा एकदा हाहाकार माजला आहे. शांघायमध्ये लोकांना घरीच राहण्यास सांगण्यात आलं आहे.

china coronavirus lockdown in shanghai disneyland park covid 19 | डिस्नेलँडमध्ये फिरत होते शेकडो लोक अन् चीननं लॉकडाऊन जाहीर केलं; सगळे अडकले, पाहा Video

डिस्नेलँडमध्ये फिरत होते शेकडो लोक अन् चीननं लॉकडाऊन जाहीर केलं; सगळे अडकले, पाहा Video

Next

चीनमध्ये सध्या कोरोना व्हायरसमुळे पुन्हा एकदा हाहाकार माजला आहे. शांघायमध्ये लोकांना घरीच राहण्यास सांगण्यात आलं आहे. यासोबतच मोठ्या प्रमाणात कोविड चाचण्या केल्या जात आहेत. मात्र शांघायमध्येच अशी घटना घडली, ज्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. नेहमीप्रमाणे मोठ्या संख्येनं लोक शांघायमधील डिस्नेलँडमध्ये गेले होते. पण त्याच दरम्यान चीन सरकारनं लॉकडाऊनची घोषणा केली. यामुळे डिस्नेलँडच्या व्यवस्थापनानं उद्यानाचे सर्व दरवाजे बंद केले. अशा स्थितीत आत असलेले लोक अस्वस्थ झाले. ही घटना सोमवारी घडली आहे.

सरकारने लॉकडाऊन लादला तेव्हा डिस्नेलँडमध्ये शेकडो लोक उपस्थित होते. डिस्नेलँडने आपले सर्व दरवाजे बंद केले. यानंतर कोणालाही बाहेर पडू दिले नाही किंवा आत जाऊ दिले नाही. चिनी सोशल मीडिया WeChat वर, सरकारकडून असे सांगण्यात आले की आतल्या सर्व लोकांची कोविड चाचणी होईल. यामध्ये ज्यांची कोविड चाचणी निगेटिव्ह येईल, त्यांनाच तेथून जाण्याची परवानगी दिली जाईल. सरकारच्या आदेशात असेही म्हटले आहे की २७ ऑक्टोबरपासून आतापर्यंत जे लोक डिस्नेलँडमध्ये गेले आहेत, त्यांची येत्या तीन दिवसांत कोरोना चाचणी केली जाऊ शकते. 

गेल्या वर्षीही लॉकडाऊनमुळे ३० हजार लोक अडकलेले
डिस्नेलँडमध्ये अडकलेल्या लोकांचे व्हिडिओही सोशल मीडियावर समोर आले आहेत. उद्यानाच्या दाराजवळ शेकडो लोक उपस्थित असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वीही डिस्नेलँड पार्क गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अचानक बंद करण्यात आलं होतं. त्यावेळी उद्यानात ३० हजारांहून अधिक लोक उपस्थित होते. या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. 

आयफोन फॅक्टरीमधूनही कर्मचाऱ्यांचा पळ 
चीनचे काही व्हिडिओ आणि फोटो समोर आले होते, ज्यामध्ये चीनमधील झेंगझोऊ येथील Apple कंपनीच्या आयफोन निर्मिती कारखान्यात कोरोना विषाणूचा संसर्ग आणि लॉकडाऊन पसरण्याच्या भीतीने कामगार पळून जाताना दिसत होते. हे सर्वजण पायी आपापल्या घराकडे निघाले होते. apple चे सर्वात लोकप्रिय उत्पादन असलेल्या आयफोनचे सर्वात मोठा कारखाना झेंगझोऊ येथे आहे. फॉक्सकॉन सुमारे दोन लाख कर्मचाऱ्यांसह हा प्लांट चालवतं.

एका कर्मचाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार कारखान्याच्या असेंबली लाईनवर तैनात असलेल्या कामगारांना संसर्ग होत असल्याच्या बातम्या सतत येत आहेत. अशा स्थितीत कर्मचाऱ्यांना जीवाची भीती वाटू लागली असून त्यांनी काम सोडण्यास सुरुवात केली आहे. फॉक्सकॉनकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार कारखान्यात काम करणार्‍या कामगारांचा बाहेरील लोकांशी कोणताही संपर्क नाही आणि व्यवस्थापन संक्रमण नियंत्रित करण्यासाठी क्लोज-लूप पद्धतीचा अवलंब करत आहे.

Web Title: china coronavirus lockdown in shanghai disneyland park covid 19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :chinaचीन