China Coronavirus: हवेच्या माध्यमातून लोकांमध्ये पसरतोय कोरोना व्हायरस; शांघाय अधिकाऱ्यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2020 01:50 PM2020-02-09T13:50:09+5:302020-02-09T13:52:24+5:30
एयरोसोल ट्रान्समिशन म्हणजे व्हायरस हवेतील सूक्ष्म कणांमध्ये मिसळतो.
नवी दिल्ली - चीनमध्ये मोठ्या प्रमाणात पसरलेल्या कोरोना व्हायरसबाबत आणखी एक खुलासा झाला आहे. ज्यामुळे या व्हायरसची तीव्रता प्रकर्षणाने जाणवू शकते. कोरोना विषाणू आता सूक्ष्म हवेमध्ये मिसळून हवेच्या माध्यमातून दुसर्या व्यक्तीस हा रोग संक्रमित करीत आहे, ज्याला एयरोसोल ट्रान्समिशन म्हणून ओळखले जाते असा दावा शांघायमधील अधिकाऱ्यांनी केला आहे. आतापर्यंत केवळ विषाणूचे थेट ट्रांसमिशन (कॉन्टॅक्ट ट्रांसमिशन) होत असल्याची खात्री झाली होती.
शांघाय सिव्हिल अफेयर्स ब्युरोचे उपप्रमुख म्हणाले की, 'एयरोसोल ट्रान्समिशन म्हणजे व्हायरस हवेतील सूक्ष्म कणांमध्ये मिसळतो. वैद्यकीय तज्ञांच्या मते, हे श्वासोच्छवासामुळे याचा संसर्ग पसरत आहे. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना संसर्ग होऊ नये म्हणून उपाययोजनांबाबत जनजागृती करण्याचे आवाहन या अधिकाऱ्यांनी केलं आहे.
कोरोना व्हायरसच्या धसक्यामुळे 'या' मुस्लीम देशाने आणली Kiss करण्यावर बंदी
थेट प्रसाराचा अर्थ असा आहे की जर एखाद्या संक्रमित व्यक्तीला शिंका किंवा खोकला आला तर व्हायरस जवळच्या श्वास घेत असलेल्या व्यक्तीमध्ये प्रवेश करेल. त्याच वेळी, जेव्हा विषाणू असलेल्या हवेचे सूक्ष्म कण ऑब्जेक्टला स्पर्श करून एखादी व्यक्ती तोंड, नाक किंवा डोळा स्पर्श करते तेव्हा संपर्क प्रसारित होतो असं तज्ज्ञांचे म्हणणं आहे.
चीन सरकारने लोकांना आवाहन केलं आहे की, एकाच ठिकाणी एकत्रित होण्याचे टाळावे, वेंटिलेशनसाठी खिडक्या उघडा, स्वच्छतेची काळजी घ्यावी आणि घरात फवारणी व साफसफाई सुरू ठेवावी, खासकरुन दाराची हँडल्स, जेवणाची टेबल्स आणि शौचालयाच्या जागा स्वच्छ ठेवा विशेष म्हणजे डिसेंबरमध्ये चीनमधील वुहान शहरातून सुरू झालेल्या कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 811 लोकांचा बळी गेला आहे.
धक्कादायक! अवघ्या 15 सेकंदात 'कोरोना'ची लागण; 722 जणांचा मृत्यू
दरम्यान, चीनपुरता हा व्हायरस मर्यादित नसून जगातील सुमारे 30 देशांतील 150 लोकांना त्याची लागण झाली आहे. संसर्ग होऊ नये, यासाठी चीनने तर दोन राज्यांतील लोकांना अन्य राज्यांमध्ये जाण्यासच बंदी घातली आहे. काही शहरांमधील लोकांना घराबाहेर पडायलाही बंदी आहे. अवघ्या 15 सेकंदात एका व्यक्तीला 'कोरोना'ची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चीनमधील एका 56 वर्षीय व्यक्तीला 15 सेकंदात कोरोनाची लागण झाली. बाजारामध्ये फक्त 15 सेकंदासाठी महिलेच्या संपर्कात आल्याने कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
कोरोना विषाणूबाबत धोक्याचा इशारा देणाऱ्या डॉक्टरचा मृत्यू