China Coronavirus : जागतिक आरोग्य संघटनेनं 'कोरोना'ला दिलं नवं नाव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 08:30 AM2020-02-13T08:30:19+5:302020-02-13T08:34:22+5:30
कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे चीनमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या १११३ झाली असून, रुग्णांची संख्या ४४,२०० वर गेली आहे.
बीजिंग - कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे चीनमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या १११३ झाली असून, रुग्णांची संख्या ४४,२०० वर गेली आहे. चीनच्या हुवेई प्रांतात बुधवारी ९४ जणांचा या व्हायरसने बळी घेतला. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरसच्या संसर्गाला आता ‘कोविड-१९’ हे नाव दिले आहे. कोरोनातील को, व्हायरस (विषाणू) तील व्ही आणि आजार (डिसिज) मधील डी यातून ते नाव तयार केले आहे. हा व्हायरस २०१९ मध्ये आढळल्याने त्यापुढे १९ हा उल्लेख ठेवला आहे.
कोरोनो व्हायरसच्या संसर्गामुळे जगभरात चिंतेचे वातावरण असून, ४० हून अधिक देशांनी हाय अलर्ट घोषित केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने तर जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण चीनमध्ये ३१ डिसेंबर रोजी आढळला. त्यानंतर अशा रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. त्याचा संसर्ग वाढू नये, म्हणून रुग्णांसाठी चीनने विशेष हॉस्पिटल बांधले आहे.
'हा' दुर्मिळ प्राणी खाल्ल्यामुळे पसरला कोरोना व्हायरस!https://t.co/zryXwtZgP5#coronvirus
— Lokmat (@MiLOKMAT) February 13, 2020
रुग्णांना अन्य लोकांपासून दूर ठेवण्यात येत आहे. तरीही त्याची लागण झालेले रुग्ण वाढतच चालले आहेत. त्यामुळे अनेक देशांनी चीनशी विमानसेवा सध्या बंद केली आहे आणि चीनच्या व तेथून येणाऱ्यांना तूर्त व्हिसा न देण्याचे ठरविले आहे. भारतात आतापर्यंत कोरोनाचे तीन रुग्ण आढळले असून, ते केरळमधील आहेत. चीनच्या वुहान प्रांतातून आणण्यात आलेल्या ६४० पैकी एकालाही संसर्ग झालेला नाही.
China Coronavirus : धक्कादायक! साध्या तापाला 'कोरोना' व्हायरस समजून त्याने उचललं टोकाचं पाऊलhttps://t.co/NNC4aRnTI5#coronaviruspic.twitter.com/mAW65Kg0kB
— Lokmat (@MiLOKMAT) February 12, 2020
वुहानमध्ये अद्याप ७० भारतीय आहेत आणि त्यांना लागण झालेली नाही, असे भारतीय परराष्ट्र खात्यातर्फे सांगण्यात आले. मात्र, जपानमध्ये जी क्रूझ (पर्यटक जहाज) आली आहे, तिच्यावरील १७४ जणांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला असल्याचे बुधवारी सांगण्यात आले. त्या क्रूझवर १३२ भारतीय आहेत. त्यातील १३२ क्रूझवरील कर्मचारी व अधिकारी आहेत. त्या क्रूझला बंदरात येण्यास मज्जाव केला असून, ते जहाज लांब समुद्रात उभे आहे.
महत्त्वाच्या बातम्या
दिल्लीहून बिहारला जाणाऱ्या बस अन् ट्रकचा भीषण अपघात, 16 जणांचा मृत्यू, 35 जखमी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा 'तो' व्हिडीओ पाहून मन हेलावून गेलं- संभाजी राजे
ठाकरे सरकारच्या शपथविधीचा खर्च नेमका किती? ताळमेळच लागेना
यंदा अतिरिक्त २२ सुट्ट्या!; पाच दिवस आठवड्याचा असाही फायदा