मालदीव, श्रीलंकानंतर आता आणखी एक देश चीनच्या कर्ज जाळ्यात अडकला; 'ड्रॅगन' जमीन बळकावणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 07:37 PM2021-07-07T19:37:36+5:302021-07-07T19:38:35+5:30

China Could Seize Montenegro’s Land: चीनच्या कर्जाच्या चक्रव्युव्हात आजवर अनेक देश फसले आहेत आणि आता आणखी एक देशाची अशीच काहीशी परिस्थिती झाली आहे.

China could now seize land of Montenegro for not paying one billion dollar loan payment | मालदीव, श्रीलंकानंतर आता आणखी एक देश चीनच्या कर्ज जाळ्यात अडकला; 'ड्रॅगन' जमीन बळकावणार!

मालदीव, श्रीलंकानंतर आता आणखी एक देश चीनच्या कर्ज जाळ्यात अडकला; 'ड्रॅगन' जमीन बळकावणार!

Next

China Could Seize Montenegro’s Land: चीनच्या कर्जाच्या चक्रव्युव्हात आजवर अनेक देश फसले आहेत आणि आता आणखी एक देशाची अशीच काहीशी परिस्थिती झाली आहे. युरोपमधील मॉन्टेनेग्रो नावाच्या छोटाशा देशानं चीनकडून घेतलेल्या एक अब्ज डॉलरची परतफेड करण्यात असमर्थ ठरला आहे. देशातील बेल्ट अँड रोड प्रकल्पासाठी चीनकडून मॉन्टेनेग्रोनं कर्ज घेतलं होतं. याअंतर्गत एक मोठा महामार्ग तयार करण्याचं काम सुरू होतं. पण काही किमीचंच काम पूर्ण होऊ शकलं. आता श्रीलंका आणि मालदीवनंतर मॉन्टेनेग्रो देश देखील चीनच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला आहे. (China could now seize land of Montenegro for not paying one billion dollar loan payment)

मॉन्टेनेग्रो देशाला चीनकडून घेतलेलं सारं कर्ज चुकतं करावं लागणार आहे. जर असं केलं नाही, तर देश दिवाळखोर म्हणून घोषित केला जाईल आणि चीन या देशाच्या जमिनीवर आपला दावा ठोकू शकतो. डेलीमेलच्या अहवालानुसार, चीनची सरकारी कंपनी चायना रोड अँड ब्रिज कॉर्पोरेशन या प्रकल्पाशी जोडली गेलेली आहे ही हैराण करणारी गोष्ट आहे. या प्रकल्पाअंतर्गत ज्या पुलाची निर्मिती केली जात आहे त्यासाठी कामगार देखील चीनमधून मागविण्यात आले आहेत. पण या महामार्गाचं काम काही पूर्ण होऊ शकलेलं नाही. 

देशावर जीडीपीपेक्षाही दुप्पट कर्ज
मॉन्टेनेग्रो देशाला याच महिन्यात एक अब्ज डॉलरचा पहिला हप्ता चीनला द्यायचा आहे. पण इतके पैसे देश देऊ शकणार आहे का? याची कोणतीही स्पष्टता अद्याप नाही. सध्याच्या घडीला देशाच्या एकूण जीडीपीपेक्षाही दुप्पट देशावर कर्ज आहे. चीनसोबत झालेल्या एका करारानुसार जर मॉन्टेनेग्रो देशानं वेळेत कर्जाची रक्कम चुकती केली नाही, तर चीनकडे देशाच्या जमिनीवर हक्क सांगण्याचा अधिकार आहे. 

Web Title: China could now seize land of Montenegro for not paying one billion dollar loan payment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.