चिंताजनक! चीन करतंय जीवघेण्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर प्रयोग; जगभरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 01:41 PM2024-01-18T13:41:50+5:302024-01-18T13:42:31+5:30

Corona Virus : कोरोना संसर्गाने जगभरातील कोट्यवधी निष्पाप लोकांचे बळी घेतले आहेत. मात्र असं असताना चीनच्या या नव्या चालीमुळे जगभरात खळबळ उडाली आहे.

china covid 19 sars cov 2 pangolin corona virus gx p2v experimenting deadly new strain | चिंताजनक! चीन करतंय जीवघेण्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर प्रयोग; जगभरात खळबळ

चिंताजनक! चीन करतंय जीवघेण्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर प्रयोग; जगभरात खळबळ

कोरोना व्हायरसमुळे जगात पुन्हा एकदा विध्वंस होऊ शकतो. यासाठी चीनने तयारी सुरू केली आहे. आत्तापर्यंत कोरोना संसर्गाने जगभरातील कोट्यवधी निष्पाप लोकांचे बळी घेतले आहेत. मात्र असं असताना चीनच्या या नव्या चालीमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. चीन एका नवीन प्राणघातक कोरोनासारख्या व्हायरसवर प्रयोग करत आहे. या व्हायरसच्या संसर्गामुळे उंदरांचा मृत्यू होण्याचे प्रमाण 100 टक्के आहे. अशा परिस्थितीत हा व्हायरस माणसांसाठी धोकादायक ठरू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. 

प्री-पीअर रिव्ह्यू केलेल्या जर्नलमध्ये हा दावा करण्यात आला आहे. बायोरेक्सिववर 3 जानेवारी रोजी प्रकाशित झालेल्या एका पेपरमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, चिनी सैन्याच्या (People’s Liberation Army -PLA) प्रशिक्षित डॉक्टरांनी पँगोलिन कोरोना व्हायरसचा एक नवीन प्रकार तयार केला आहे. प्रयोगशाळेत बनवलेल्या या व्हायरसला GX_P2V असे नाव देण्यात आलं आहे.

GX_P2V चा संसर्ग झाल्यावर उंदरांमध्ये गंभीर लक्षणं दिसली. संसर्ग झाल्यानंतर 5 दिवसात उंदरांचं वजन झपाट्याने कमी होऊ लागले. त्याला सुस्ती वाटू लागली. यासोबतच उंदरांचे डोळेही पांढरे होऊ लागलं. व्हायरसची लागण झाल्यानंतर 8 दिवसात उंदरांचा मृत्यू झाला. यावरून हा व्हायरस किती प्राणघातक आहे हे लक्षात येते. हा व्हायरस उंदरांच्या मेंदू, डोळे आणि फुफ्फुसांमध्ये पसरल्याचं संशोधनातून दिसून आले आहे. यासोबतच उंदरांच्या मृत्यूपूर्वी गेल्या दोन दिवसांत मेंदूमध्ये व्हायरसचा प्रभाव अधिक होता.

व्हायरस संक्रमित उंदरांमध्ये, फुफ्फुसातील व्हायरल सहाव्या दिवसापर्यंत कमी झाला. तिसऱ्या दिवशी मेंदूच्या नमुन्यांमधील व्हायरल आरएनए लोड आणि व्हायरल टायटर्स कमी होतं. पण सहाव्या दिवशी त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. हा निष्कर्ष असे सूचित करतो की संक्रमणाच्या नंतरच्या टप्प्यात गंभीर मेंदूचा संसर्ग या उंदरांमध्ये मृत्यूचे प्रमुख कारण असू शकतं.

माणसांनाही व्हायरसचा धोका

अभ्यासात GX_P2V व्हायरसबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. त्याचा माणसांवरही परिणाम होऊ शकतो. संसर्ग झाल्यानंतर उंदरांचा मृत्यू झाला आहे. रिसर्च टीम म्हणते की, मृत्यूचे कारण मेंदूच्या संसर्गाशी संबंधित असू शकतं. हा व्हायरस केवळ उंदरांच्या शरीरातच पसरला नाही तर मेंदू, डोळे आणि फुफ्फुस यासारख्या महत्त्वाच्या अवयवांपर्यंतही पोहोचला. टीमने पुढे सांगितलं की SARS-CoV-2 शी संबंधित पँगोलिन कोरोना व्हायरस हा hACE2 उंदरांमध्ये 100 टक्के मृत्युचं कारण होऊ शकतो. GX_P2V माणसांमध्ये देखील पसरू शकतो.
 

Web Title: china covid 19 sars cov 2 pangolin corona virus gx p2v experimenting deadly new strain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.