हाहाकार! चीनमध्ये कोरोनाचा कहर; अंत्यसंस्कारासाठी लांबच लांब रांगा, परिस्थिती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 07:15 PM2022-12-17T19:15:03+5:302022-12-17T19:25:21+5:30

2 कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या बीजिंगमध्ये शनिवारी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांच्या अंत्यसंस्कारासाठी झुंबड उडाल्याचं पाहायला मिळालं.

China covid hit beijing funeral homes with sick workers struggle to keep up | हाहाकार! चीनमध्ये कोरोनाचा कहर; अंत्यसंस्कारासाठी लांबच लांब रांगा, परिस्थिती गंभीर

हाहाकार! चीनमध्ये कोरोनाचा कहर; अंत्यसंस्कारासाठी लांबच लांब रांगा, परिस्थिती गंभीर

googlenewsNext

चीनमधील कोरोना महामारीचा कहर अजूनही थांबलेला नाही. कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. 2 कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या बीजिंगमध्ये शनिवारी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांच्या अंत्यसंस्कारासाठी झुंबड उडाल्याचं पाहायला मिळालं. अंत्यसंस्कारासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मोठ्या संख्येने मजूर आणि चालकांची कोविड चाचणी पॉजिटिव्ह आली आहे, ज्यामुळे ही परिस्थिती उद्भवली. अलीकडेच देशात 'झिरो कोविड पॉलिसी' विरोधात मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली. 

राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर विरोधाचा सामना करावा लागला. यानंतर चीनने अचानक आपला कोविड व्यवस्थापन प्रोटोकॉल बदलला. सतत चाचणी, लॉकडाऊन आणि कठोर प्रवास निर्बंधांसह, चीन कोविड साथीच्या आजाराचा सामना करत आहे. देशाने आपल्या 1.4 अब्ज लोकसंख्येला सांगितले आहे की, सौम्य लक्षणं असल्यास घरांमध्येच स्वत: ची काळजी घ्यावी.

बीजिंगमध्ये 7 डिसेंबर रोजी कोविड व्यवस्थापन धोरणांमध्ये बदल झाल्यापासून, कोविडमुळे मृत्यूची नोंद झालेली नाही. कोरोना व्हायरसचा पार्लर, रेस्टॉरंट आणि कुरिअर फर्म्सपासून अधिक सेवांमधील मजूर आणि कर्मचाऱ्यांवर परिणाम झाला आहे. मियुन स्मशानभूमीतील एका कर्मचाऱ्याने सांगितले, "आमच्याकडे आता कमी कर्मचारी आहेत. तसेच अंत्यसंस्कार सेवांची मागणी वाढत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

"चीनमध्ये कोरोनामुळे 10 लाख लोकांचा होऊ शकतो मृत्यू"; धडकी भरवणारा रिसर्च

चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना व्हायरस वेगाने वाढत आहे. चीनमध्ये आठवड्यापूर्वी झिरो कोविड पॉलिसी शिथिल करण्यात आली होती, त्यानंतर आता प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे, चीनची आरोग्य यंत्रणा रुळावरून घसरत आहे, ज्यामुळे 10 लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो असे तज्ञांचे मत आहे. कोरोनाबाबत एक संशोधन समोर आलं आहे. रिसर्चचे सह-लेखक आणि हाँगकाँग विद्यापीठातील मेडिसिन विभागाचे माजी डीन ग्रेब्रियल लेउंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, "चीन सरकारने कोणत्याही बूस्टर लसीशिवाय कोरोनाचे नियम शिथिल केले आहेत. यामुळे सुमारे 10 लाख लोकांपैकी 684 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होणार आहे." 

नवा रिसर्च सार्वजनिकरित्या प्रसिद्ध केला गेलेला नाही परंतु ब्लूमबर्गने याबाबत माहिती दिली. असा अंदाज आहे की चीनमध्ये 964,400 लोकांचा व्हायरसमुळे मृत्यू होऊ शकतो. रिपोर्टनुसार, संशोधकांनी लिहिले की, "आमचे निकाल असे सूचित करतात की डिसेंबर 2022-जानेवारी 2023 पर्यंत कोरोना नियम शिथिल केल्याने प्रकरणांमध्ये वाढ होईल. कोरोना रुग्णांच्या संख्येत इतकी मोठी वाढ होईल की सर्व प्रांतातील रुग्णालयांना प्रकरणे हाताळणे कठीण होईल." असंही म्हटलं आहे. दरम्यान, चीनमध्ये कोरोना प्रकरणांमध्ये घट होत आहे, याचे कारण चीनने अनिवार्य पीसीआर चाचणी रद्द केली आहे. इतकेच नाही तर मंगळवारपासून चीन सरकारने कोरोना प्रकरणांची घोषणा करणेही बंद केले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: China covid hit beijing funeral homes with sick workers struggle to keep up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.