वॉल्ट डिझनी कंपनीचा मोठा निर्णय, चीनमधील इंग्रजी शिकवणारी सेन्टर्स करणार बंद, 'असे' सांगितले कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 05:34 PM2020-06-24T17:34:08+5:302020-06-24T17:41:57+5:30

डिझनी कंपनीने 2008मध्ये चीनमध्ये या शाळा सुरू केल्या होत्या. त्या काळात चीनच्या मध्यम वर्गांत इंग्रजी शिकण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर सुरू होती. हे लक्षात घेत डिझनी इंग्लिशने येथे आपले सेन्टर्स सुरू केले होते. 

china disney exits language school business in china due to coronavirus | वॉल्ट डिझनी कंपनीचा मोठा निर्णय, चीनमधील इंग्रजी शिकवणारी सेन्टर्स करणार बंद, 'असे' सांगितले कारण

वॉल्ट डिझनी कंपनीचा मोठा निर्णय, चीनमधील इंग्रजी शिकवणारी सेन्टर्स करणार बंद, 'असे' सांगितले कारण

Next
ठळक मुद्देवॉल्ट डिझनीने चीनमध्ये इंग्रजी शिकवण्यासाठी 6 शहरांमध्ये आपले सेन्टर्स सुरू केले होते.डिझनी कंपनीने 2008मध्ये चीनमध्ये हे सेन्टर्स सुरू केले होते. चीनमधील लोकांना त्यांच्या भाषेसोबतच इंग्रजी शिकवण्यासाठी या सेन्टर्सची सुरुवात करण्यात आली होती.

बिजिंग : वॉल्ट डिझनी कंपनीने चीनमधीलइंग्रजी भाषा सेन्टर्सची साखळी असलेले डिझनी इंग्लिश बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वॉल्ट डिझनी कंपनी आपल्या या साखळीच्या माध्यमातून चीनमधील मुलांना इंग्रजी शिकवत होती.

वॉल्ट डिझनीने चीनमध्ये इंग्रजी शिकवण्यासाठी 6 शहरांमध्ये आपले सेन्टर्स सुरू केले होते. कंपनीने आपल्या अभ्यासक्रमात मिकी माऊस आणि लिटिल मरमेडचा प्रयोग केला होता. चीनमध्ये जेव्हापासून कोरोना व्हायरसचे संकट पसरले आहे, तेव्हापासून या शाळा अथवा सेन्टर्स बंद करण्यात आले आहेत. सरकारने आपल्या सर्वच शाळा यापूर्वीच बंद केल्या आहेत. त्याच बरोबर, अशा असे विशेष क्लासेस घेणारे सेन्टर्सदेखील बंद करण्यात आले होते. आता पाच महिन्यांनंतर चीनमध्ये हळू-हळू शाळा सुरू करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. काही शाळातर सुरूही करण्यात आल्या आहेत.

सुरू करण्यात आलेल्या शाळांमध्ये तेथील विद्यार्थी विविध प्रकारची सुरक्षितता बाळगत आणि सरकारने दिलेल्या सूचनांचे पालनक करत शाळांत येत आहेत. मात्र या विशेष भाषांच्या शाला अथवा सेन्टर्स पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने अद्याप सरकारने काहीही पावले उचललेली नाहीत. यामुळे डिझनी कंपनीने स्वतःच आपल्या शाळा अथवा सेन्टर्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या सुरू करण्याची परवानगी अद्याप देण्यात आलेली नाही.

डिझनी कंपनीने 2008मध्ये चीनमध्ये हे सेन्टर्स सुरू केले होते. त्या काळात चीनच्या मध्यम वर्गांत इंग्रजी शिकण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर सुरू होती. हे लक्षात घेत डिझनी इंग्लिशने येथे आपले सेन्टर्स सुरू केले होते. 

डिझनीचे कार्यकारी उपाध्यक्ष महेश सामत यांनी सांगितले, की चीनमधील लोकांना त्यांच्या भाषेसोबतच इंग्रजी शिकवण्यासाठी या सेन्टर्सची सुरुवात करण्यात आली होती. मात्र, कोरोना व्हायरसमुळे बंद झालेल्या या शाळा सुरू करणे अवघड होत आहे. कंपनीने हे सेन्टर्स बंद करण्यासाठी सुरू केले नव्हते.

महत्वाच्या बातम्या -

...म्हणून भारताच्या मुत्सद्देगिरीपुढं झुकला चीन! 50 दिवसांच्या संघर्षानंतर 'मजबूर'

चीनच्या दादागिरीला भारताचं चोख उत्तर, टक्कर देण्यासाठी तयार केलं जबरदस्त 'चक्रव्यूह'

मोदी सरकारच्या 'या' निर्णयामुळे चीनला झोंबली मिर्ची; ...तर अमेरिका अन् रशियाही कामी येणार नाही, भारताला दिली धमकी

फायर पावरच्या बाबतीत इंडियन एअरफोर्स ड्रॅगनला भारी; चीनच्या कोणत्याही कोपऱ्यात करू शकते हल्ला!

भारतासाठी धोका बनलाय चीन, हा 'खास' मित्र लवकरच देणार 33 फायटर जेट

सानिया मिर्झाच्या पतीवर कोरोनाचं संकट! आज येईल रिपोर्ट; ...तरच मिटेल 'लंबी जुदाई'

Web Title: china disney exits language school business in china due to coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.