चंद्रयान-३ चे यश चीनला बघवेना, लँडिंग साइटबाबतचा भारताचा दावा खोटा असल्याचे म्हटले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 12:36 PM2023-09-28T12:36:02+5:302023-09-28T12:36:52+5:30
चीनने भारताच्या चंद्रयान ३ मोहिमेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
भारताच्या चंद्रयान ३ मोहिमेला मोठं यश मिळाले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे, यामुळे भारताच्या इस्त्रोचे जगभरात कौतुक होत आहे. पण, भारताच्या या यशावर चीनने प्रश्न उपस्थित केले आहेत. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ चंद्रयान-३ लँडिंगचा भारताचा दावा खोटा असल्याचे चीनच्या मून मिशनचे संस्थापक म्हणाले.
मोहिमेचे मुख्य शास्त्रज्ञ ओयांग जियुआन म्हणाले की, चंद्रयान-३ भारताच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरले आहे असे भारताचे म्हणणे चुकीचे आहे.
मणिपूर पुन्हा पेटलं! जमावाने भाजप कार्यालयाला लावली आग, दोन विद्यार्थ्यांच्या हत्येचा निषेध सुरुच
२३ ऑगस्ट रोजी चंद्रयान-३ च्या लँडिंगनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही इस्त्रोचे कौतुक केले होते. पीएम मोदी म्हणाले होते की, 'आमच्या शास्त्रज्ञांच्या कठोर परिश्रम आणि प्रतिभेने भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचले आहे, जिथे जगातील कोणताही देश आजपर्यंत पोहोचू शकला नाही.
इस्त्रोने लँडिंगनंतर चंद्रयान ३ मोहिमे संदर्भात माहिती दिली होती. यात त्यांनी चंद्र मोहीम चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यशस्वीरित्या उतरली आहे. या दाव्यावर आता चीनच्या अंतराळ संस्थेने प्रश्न उपस्थित केले आहेत. चीनने म्हटले आहे की, भारताची चंद्र मोहीम दक्षिण ध्रुव प्रदेशात नाही तर चंद्राच्या दक्षिण गोलार्धात उतरली होती. "चंद्रयान-३ ची लँडिंग साइट चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर नव्हती, किंवा ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या प्रदेशात किंवा आर्क्टिक ध्रुवीय प्रदेशाजवळ उतरले नव्हते, असा दावा त्यांनी केला आहे.
भारताचे रोव्हर अंदाजे ६९ अंश दक्षिण अक्षांशावर उतरले. ते ८८.५ आणि ९० अंशांच्या अक्षांशांच्या दरम्यान असलेल्या दक्षिण ध्रुव प्रदेशात नाही तर चंद्राच्या दक्षिण गोलार्धात उतरले. पृथ्वी ज्या अक्षावर सूर्याभोवती फिरते तो २३.५ अंशांनी झुकलेला असतो, त्यामुळे दक्षिण ध्रुव ६६.५ ते ९० अंश दक्षिणेला मानला जातो. पण औयांगने असा युक्तिवाद केला की, चंद्राचा कल फक्त १.५ अंश असल्याने, त्याचा ध्रुवीय प्रदेश खूपच लहान आहे (८८.५ आणि ९० अंशांच्या अक्षांशांमधील). युरोपियन स्पेस एजन्सीने म्हटले आहे
हाँगकाँग युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञ ली मॅन-होई यांनी सांगितले की, भारताचे चंद्रयान-३ चंद्राच्या दक्षिणेकडील अक्षांशापर्यंत पोहोचले आहे आणि यापूर्वी चंद्रावर उतरलेल्या सर्व लँडर्सना मागे टाकले आहे. याला 'उच्च अक्षांश ठिकाण' म्हणता येईल. चीनच्या २०१९ च्या चंद्र मोहिमेबाबत ली म्हणाले, 'तुलना केली तर चीनचे चांगई ४ हे मिशन दक्षिण ध्रुव एटकेन बेसिन नावाच्या चंद्राच्या दुर्गम भागात उतरले होते. नावावरून तुम्हाला वाटेल की चीनचे मिशन दक्षिण ध्रुवाजवळ उतरले आहे, पण तसे नाही. चिनी मून मिशन ४५.४४ अंश दक्षिण अक्षांशावर उतरले होते.