पृथ्वीच्या पोटात 10 किलोमीटर खोल खड्डा; चीनने पुन्हा सुरू केला ड्रिलींग प्रोजेक्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 05:52 PM2023-07-21T17:52:53+5:302023-07-21T17:53:27+5:30
चीनने मे महिन्यात 10 किलोमीटर खोल खड्डा खोदल्यानंतर आता अजून एक खड्डा खोडण्याचे काम सुरू केले आहे.
China Drilling Hole: चीनमधून एक मोठी माहिती समोर येत आहे. या वर्षी मे महिन्यात पृथ्वीच्या आतील संरचनेचा अभ्यास करण्याच्या नावाखाली चीनने जमिनीत सुमारे 10,000 मीटर खोल ड्रिल(खडा) केल्याचा प्रकार समोर आला होता. आता चीनने पुन्हा एकदा हा अल्ट्रा-डीप ड्रिलिंग प्रोजेक्ट सुरू केला आहे.
यावेळी चीन पृथ्वीच्या आतील नैसर्गिक वायूचा साठा शोधण्याचा प्रयत्न करत आहे. चीनची वृत्तसंस्था शिन्हुआने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकल्पाचे नेतृत्व चायना नॅशनल पेट्रोलियम कॉर्प (CNPC) करत आहे. सिचुआन प्रांतातील शेंडी चुआनकेमध्ये या नवीन विहिरीचे(खड्ड्याचे) खोदकाम सुरू झाले आहे. याची खोली अंदाजे खोली 10,520 मीटर (10.5 किलोमीटर) आहे.
वायव्य रशियामधील कोला सुपरडीप बोरहोल, हे जगातील सर्वात खोल मानवनिर्मित छिद्र आहे. याची खोली 12,262 मीटरपर्यंत आहे. चीनने मे महिन्यात पाडलेल्या छिद्राचा हेतू चाचणी आणि पृथ्वीच्या आतील संरचना अभ्यासने होता. सिचुआनमधील सध्याचा प्रकल्प नैसर्गिक वायू साठ्यांचा शोध घेण्याच्या उद्देशाने आहे. चीनमधील काही सर्वात मोठे शेल गॅसचे साठे या भागात आहेत. खडबडीत परिसर असल्यामुळे ही वायू संसाधने काढण्यात अनेक आव्हाने आहेत.