खबरदार! भारताच्या सीमेत घुसखोरी कराल तर...; अमेरिकेनं चीनला ठणकावलं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 03:37 PM2020-05-22T15:37:15+5:302020-05-22T15:58:05+5:30
व्हाईट हाऊसने आपल्या अहवालात म्हटले आहे की, चीन भारतासह सर्व शेजारील देशांमध्ये चिथावणीखोर लष्करी कारवाया करीत आहे.
वॉशिंग्टनः चिनी सैन्याकडून वारंवार भारताच्या हद्दीत घुसखोरी केली जात आहे. भारताकडूनही या घुसखोरीला योग्य उत्तर दिलं जात आहे. त्याचदरम्यान चीनकडून भारताच्या सीमांमध्ये होत असलेला घुसखोरीवर व्हाइट हाऊसनं नाराजी व्यक्त केली आहे. तसेच चीनला भारताच्या हद्दीत घुसखोरी न करण्याचा इशाराही दिला आहे. गुरुवारी व्हाईट हाऊसने आपल्या अहवालात म्हटले आहे की, चीन भारतासह सर्व शेजारील देशांमध्ये चिथावणीखोर लष्करी कारवाया करीत आहे. तत्पूर्वी अमेरिकी राजदूतांनीही चीन भारतीय सीमांचं उल्लंघन करत असून, तो दिवसेंदिवस इतर देशांसाठी धोकादायक बनत चालल्याचंही म्हटलं होतं.
चिनी सैन्याच्या भारतीय हद्दीत अतिक्रमण करण्याच्या प्रयत्नाविरुद्ध अमेरिकाही आता भारताच्या बाजूने उभा राहिला आहे. बीजिंग आपल्या तत्त्वांचे उल्लंघन करीत आहे आणि पिवळा समुद्र, पूर्व आणि दक्षिण चिनी समुद्र, तैवान सामुद्रधुनी आणि भारत-चीन सीमेवरील घुसखोरीच्या कृत्यांनी शेजारील देशांना चीन घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे, असंही व्हाइट हाऊसच्या अहवालात म्हटले आहे. 'युनायटेड स्टेट्स स्ट्रॅटेजिक अॅप्रोच टू पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना' या नावाचा अहवाल अमेरिकन कॉंग्रेसला सादर करण्यात आला आहे. या अहवालात अमेरिकी सरकारचे चीनसंदर्भातील धोरण सुस्पष्ट मांडण्यात आले आहे.
जगभरात चीन सामर्थ्यपूर्ण होण्याच्या उद्दिष्टानं काम करीत आहे. कोणत्याही देशाला जुमानत नसल्यानं चीन आपली ताकद वाढल्याचं जगाला दाखवत आहे आणि त्याचबरोबर शक्तीचा दुरुपयोगही करत आहे, असं व्हाइट हाऊसनं म्हटलं आहे. पण अमेरिकेच्या आरोपांत तथ्य नसल्याचंही बीजिंगनं सांगितलं आहे. आम्ही सैन्य शक्तीच्या वापराला विरोध करतो, इतर देशांच्या अंतर्गत मुद्द्यांमध्ये हस्तक्षेप करीत नाहीत आणि शांततेच्या वाटाघाटीद्वारे सर्व वाद मिटविण्यास कटिबद्ध असल्याचंही चीनकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
दरम्यान, भारत चीनच्या घुसखोरीला देत असलेल्या प्रतिसादाचंही अमेरिकेकडून समर्थन करण्यात आलं आहे. दक्षिण चीन समुद्रातही चीन अशीच दादागिरी करत असून, भूमिका बदलण्याच्या मानसिकतेत नाही, असंही परराष्ट्र मंत्रालयाच्या दक्षिण व पश्चिम आशियातील प्रमुख कार्यवाह एलिस वेल्स म्हणाल्या आहेत. चिनी सैन्याच्या चिथावणीखोरीला समोरे जाण्यासाठी आम्ही कायम भारतासोबत आहोत, असंही अमेरिकेनं चीनला ठणकावलं आहे. एलिस वेल्स म्हणाल्या की, “अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया आणि समान विचारसरणी असलेले आसियान देशांचे सदस्य चीनच्या चिथावणीखोर आणि त्रासदायक वृत्तीच्या विरोधात एकत्र आले आहेत. चीनला रोखणे आवश्यक आहे. चीन आपली वाढलेली ताकद दाखवण्याचा वारंवार प्रयत्न करत आहे. त्यामुळे चीनच्या शेजारील देशांचा त्याचा धोका आहे, असंही अमेरिकेनं स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा
योगी देणार चीनला 'दणका'; बेरोजगारांना लागणार लॉटरी?, अनेक कंपन्या 'ड्रॅगन'ला सोडून UPच्या वाटेवर
CoronaVirus News : "केंद्राने ४६८ कोटी दिले, पण ठाकरे सरकार एक दमडीचंही पॅकेज द्यायला तयार नाही"
CoronaVirus News : शेतकरी संघटनेने मूठभर कापूस जाळून केला शासनाचा निषेध
CoronaVirus News :चार दिवस करा काम अन् तीन दिवस आराम, पंतप्रधानांनी कंपन्यांना सुचवला 'उपाय'
VIDEO: गर्भवती महिलेला घेऊन जाणाऱ्या अँब्युलन्ससमोर अचानक आला सिंहांचा कळप अन्...
CoronaVirus News : कोरोना चाचणी स्वस्त होणार; टास्क फोर्स प्रमुखांचे दिलासादायक संकेत
CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात 'ही' कंपनी कर्मचाऱ्यांना बोनस देणार अन् 15000 जणांची भरती करणार
जिओची पाचवी मोठी डील, अमेरिकन कंपनी KKRने गुंतवले 11,367 कोटी